मुंबई : आपल्या लूकने चाहत्यांचे हार्टबिट्स वाढवणाऱ्या नोरा फतेहीचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या नव्या लूकमध्ये नोराने चॉकलेटी आणि गोल्डन मिक्स शिमरी ड्रेस परिधान केला आहे. फोटोत तिचा किलर लूक पाहून चाहत्यांमध्ये एकच चर्चा होतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परिधान केला शिमरी ड्रेस
फोटोंमध्ये नोराने कोट स्टाईल टॉप घातला आहे. ज्यासोबत अभिनेत्रीने ट्राऊझर परिधान केलं आहे. त्याचबोरबर नोराने तिच्या गळ्यात हेवी चोकर स्टाइलचे दागिने घातले आहेत. दुसरीकडे, जर आपण ड्रेसच्या रंगाबद्दल बोललो तर चॉकलेट आणि गोल्डन मिक्स शिमरी ड्रेस नोराने परिधान केला आहे. आपला लूक पूर्ण करण्यासाठी नोराने ओपन केसांसोबतच हलका मेकअप केलाय.



फोटोशूटसाठी फोटो
या फोटोशूटमधील नोराचा लूक पाहण्याजोगा आहे. अभिनेत्रीच्या या फोटोंचं बॅकग्राऊंड सिल्व्हर कलरचं आहे. ज्यामध्ये ती कधी जमिनीवर बसून तर कधी स्टूलवर बसून किलर पोज देताना दिसणारेय. नोरा सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसोबत नेहमी काही ना काही शेअर करते. ज्यामुळे ती चर्चेत असते. नोरा कधी तिच्या कपड्यांमुळे तर कधी तिच्या डान्समुळे चर्चेत असते. पण हेडलाइन्समध्ये कसं राहायचं हे अभिनेत्रीला चांगलंच ठाऊक आहे.