फोटोग्राफरसोबत काय आहे नोराचं कनेक्शन, इतकी का लाजते?
नोरा फतेही यावेळी तिच्या कपड्यांमुळे नाही तर नावामुळे चर्चेत
मुंबई : गुरू रंधावा (Guru Randhawa) आणि नोरा फतेही यांच्या 'डांस मेरी रानी' या नव्या गाण्याने धुमाकूळ घातला आहे. या अगोदरही दोघं 'नाच मेरी रानी' म्युझिक व्हिडीओतून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये पापाराझी नोरा फतेहीसोबत बोलत आहेत. आणि तेव्हा नोरा इतकी लाजते की त्याचा अंदाज लावणे कठीण झाले आहे.
नोरा फतेही आणि गुरू रंधावा पापाराझीसमोर फोटोशूट करता उभे राहतात. यावेळी पापाराझी नोराला 'राणी' या नावाने हाक मारतात. यावेळी गुरू रंधावा तर हसतोच पण नोरा खूप लाजते. नोरा स्वतःच हसणं रोखू शकत नाही.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सुरूवातीला पापाराझी नोराला 'नोरा पाजी' या नावाने हाक मारतात. हे ऐकून सुरूवातीला गुरू रंधावा स्वतःला हसण्यापासून रोखू शकत नाही. यानंतर नोरा म्हणते, 'चांगलंय, पाजी बोलले, बहिण तर नाही ना बोलले.... '
नोरा आणि गुरु रंधवाचे हे गाणे लोकांना खूप आवडते. या डान्स व्हिडिओमध्ये लोक नोराच्या योग्य स्टेप्सचे कौतुक करत आहेत. या गाण्याच्या प्रमोशनसाठी नुकतेच नोरा आणि गुरु रंधावाही कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचले होते. नोराने सगळ्यांना स्टेजवर डान्स करायला लावला, पण स्टेजवर जे घडलं ते पाहून प्रेक्षक खूप हसले.