मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीने फार कमी वर्षांत इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला आहे. चित्रपट आणि आयटम साँगसोबतच नोरा तिच्या हॉटनेसमुळेही खूप चर्चेत असते. चित्रपटांपेक्षाही ती तिच्या फोटोंसह चर्चेत राहते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोराच्या हॉटनेस आणि बोल्डनेसचे सर्वांनाच वेड लागले आहे. अभिनेत्री भारतीय आउटफिटमध्ये असो, किंवा मग वेस्टर्न, बिकिनी... अभिनेत्री प्रत्येक लूकमध्ये अप्रतिम दिसते आणि पाहणाऱ्यांचे संपूर्ण लक्ष वेधून घेते.


सोशल मीडियावर रोज नोराचे एकापेक्षा एक फोटो व्हायरल होतात. अभिनेत्री स्वतः सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे हॉट फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. आता अलीकडेच, अभिनेत्रीने पुन्हा तिच्या अकाऊंटवर तापमान वाढवणारे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये नोराच्या सौंदर्याची झलक दाखवली जात आहे, तसेच ती खूपच हॉट दिसत आहे.


फोटोंमध्ये, अभिनेत्री एका स्विमिंग पूलसमोर उभी आहे आणि तिचा फोन जवळून पाहत आहे. यादरम्यान तिने काळ्या रंगाची बिकिनी घातली असून त्यात ती खूपच हॉट दिसत आहे.



नोराने काळ्या रंगाच्या बिकिनीसह तिचे केस मोकळे सोडले आहेत आणि गोल्डन कानातले त्यावर मॅच केले आहेत. अभिनेत्रीने फोटोसोबत एक मजेदार कॅप्शन लिहिले आहे. नोराने कॅप्शनमध्ये लिहिले, 'मी पुढच्या सुट्टीसाठी प्लॅन करत आहे, तुम्हाला जॉईन व्हायचे आहे का?.