मुंबई : अभिनेत्री नोरा फतेहीने तिच्या डान्स स्टाईलने चाहत्यांना वेड लावलं आहे. याचबरोबर ती तिच्या फॅशन सेन्समुळेही नेहमी चर्चेत असते. ती अनेकदा वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रेसमध्ये तिचा लूक ट्राय करत असते. आता नोराने असा ड्रेस घातला आहे ज्यामध्ये तिला चालणं-फिरणं देखील कठिण झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ड्रेसमध्ये चालणं फिरणं झालं कठिण
नुकताच नोरा फतेहीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती फ्लोरल प्रिंटेड ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, नोराच्या ड्रेसचा एक भाग खूप मोठा आहे. ज्याला सांभळण्यासाठी दोन-तीन लोकांची आवश्यकता आहे. ड्रेसच्या लांबीमुळे तिला नीट चालताही येत नाही. ती तिच्या ड्रेसवरच पाय ठेवतेय. मात्र, असं असतानाही तिने पापाराझींसमोर पोज दिल्या. मात्र या सगळ्यानंतर नोराला मात्र ट्रोलिंगचा सामना करवा लागला. असे कपडे घालावे तरी का ज्यात तुम्ही कर्म्फटेबल नाही असे प्रश्न नोराला युजर्स विचारत आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हॉट लूकमध्ये अभिनेत्रीचा धुमाकूळ
नोराचा हा हॉट लूक धुमाकूळ घालत आहे. तिने आपले केस ओपन ठेवले आहेत. हाय हिल्स आणि डिझायनर कानातले तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत. नोराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर  धुमाकूळ घालत आहे. कमेंट सेक्शनमध्ये चाहते तिचं खूप कौतुक करत आहेत.