बॉलिवूड अभिनेत्रीला ईडीचे समन्स; 200 कोटी वसुली प्रकरणात होणार चौकशी
ईडीच्या रडारवर बॉलिवूड...
मुंबई : अभिनेत्री नोरा फतेहीला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. नोराला आज चौकशीसाठी बोलावले आहे. नोरा ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाली आहे. . त्यामुळे आता या प्रकरणी काय होणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे. 200 कोटी रुपयांच्या खंडणीच्या प्रकरणात सुकेश चंद्रशेखर आणि त्याची पत्नी अभिनेत्री लीना पाल तुरुंगात आहेत.
दरम्यान, सुकेशने नोरा फतेहीलाही आपल्या जाळ्यात अडकवण्याचा कट रचला होता. याआधी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि अभिनेता सोनू सून ईडीच्या जाळ्यात अडकले होते. आता ईडीच्या जाळ्यात नोरा आडकली आहे. पण याप्रकरणी नोराकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही.
नोरा फतेही एक कॅनेडियन मॉडेल-अभिनेत्री आहे. नोराने बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध आयटम साँगवर डान्स केला आहे. ती अनेक रिअॅलिटी शोमध्ये दिसली आहे. नोरा यांनी स्ट्रीट 'डान्सर 3 डी', 'बाटला हाऊस' सारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.