मुंबई : 'टायगर जिंदा है' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच  तो चर्चेमध्ये होता. सलमान आणि कॅटरिना या जोडीला सुमारे 5 वर्षानंतर रूपेरी पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार होती.


सुपर हीट गाणी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपेक्षेप्रमाणेच चित्रपटाला आणि त्याच्या गाण्यांनाही रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. विशाल - शेखर यांनी बनवलेले चित्रपटातील 'स्वॅग से स्वागत' हेे गाणं यंदा हीट ठरले आहे. युट्युबवर या गाण्याने लोकप्रियतेचा नवा विक्रम रचला आहे. हटके अंदाजात कोरिओग्राफ केलेल्या या गाण्यात कॅटरिना आणि सलमानचा कूल अंदाज दिसला. 


अरेबिक अंदाज 


'एक था टायगर' चित्रपटामध्ये कॅटरिनाने एक बेली डांस फॉर्मवर आधारित नृत्य केलं होतं.मात्र त्याच्या सिक्वेलमध्येअसं गाणंनाही.परंतू मॉडेल आणि अभिनेत्री नोरा फतेही हीने मात्र 'स्वॅग से स्वागत' चं अरेबिक व्हर्जन रसिकांसमोर आणलं आहे.  


नोराने अरेबिक व्हर्जनमधील ' स्वॅग से  स्वागत' या गाण्यावर बेली डांस केला आहे. नोराच्यामादक अदांनी हा व्हिडिओ नेटकर्‍यांच्या पसंतीला  उतरला आहे. या व्हिडिओला सुमारे 906.2k views मिळाले आहे.  


 



 


कोण आहे नोरा फतेही ?  


 ‘बाहुबली- द बिगिनिंग’ या चित्रपटामध्ये नोराने एक आयटम सॉंग केले होते.  लवकरच नोरा संजय सुरींच्या 'माय बर्थडे' सिनेमामध्ये एका गाण्यावर थिरकताना दिसणार आहे.