मुंबई : टीव्ही रियालिटी शो 'बिग बॉस 9' च्या माध्यमातून अभिनेत्री नोरा फतेही प्रसिद्धीझोतात आली. त्यानंतर नोरी 'बाहुबली' चित्रपटातील एका गाण्यात दिसली. पण 2018 साली नोराच्या करियरला नवी कलाटणी मिळाली. त्यानंतर नोराने मागे वळून कधीही पाहिलं नाही. 'सत्यमेव जयते' चित्रपटातील 'दिलबर' गाण्याने तर सर्वांना वेड लावलं.  'दिलबर'नंतर तिने अनेक आयटम सॉन्गमध्ये तिच्या डान्सच्या अदा दाखवल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण हे यश गाठण्यासाठी नोराला सुरूवातीला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. कॅनडामधून मुंबईत आपलं नशीब आजमावण्यासाठी आलेल्या नोरासाठी हा प्रवास अत्यंत जिकरीचा होता. पण तिने स्वतःला अपडेट करत  बॉलिवूडमध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. करियरच्या सुरूवातील दिग्दर्शकांकडून होणाऱ्या अपमानाचा सामना नोराला करावा लागला. 


बॉलिवूडच्या प्रवासात नोरासाठी तिची भाषा मोठी अडचण होती. 2019 साली पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत नोराने अनेक गोष्टींचा खुलासा केला. ती म्हणाली, 'सुरूवातीला मी माझ्या हिंदीवर भर दिला. पण माझे ऑडिशन फार वाईट असायचे. मी त्यांच्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार नव्हतो. मी स्वतःची चेष्टा करायचे. लोकांमध्ये दया नाव्हती.'


'समजावण्याऐवजी ते माझ्यावर हसवायचे, जणू मी एका सर्कसचा भाग आहे... अपमान करायचे... अखेर मी घरी येवून रडायचे. एक कास्टिंग एजन्टतर मला ओरडला होता आणि तुझी याठिकाणी काही गरज असं म्हणत मला घरी जाण्यासाठी त्याने सांगितलं...' असं नोराने सांगितलं आहे.