मुंबई : अभिनेत्री आणि नृत्यांगना नोरा फतेही तिच्या नृत्य कौशल्यामुळे चांगलीच चर्चेत असते. 'सत्यमेव जयते' चित्रपटातील 'दिलबर-दिलबर' या गाण्यातील तिच्या दिलखेच अदांनी चाहत्यांना प्रचंड घायाळ केले होते. त्याचप्रमाणे ती 'स्ट्रिट डान्सर ३' चित्रपटामध्ये सुद्धा तिचा नृत्याचा जलवा चाहत्यांना आणि समस्त नृत्य प्रेमींना अनुभवता येणार आहे. सध्या ती एका साहसी नृत्या शैलीचे प्रशिक्षण घेताणा दिसत आहे. फायर डान्स करताना तिचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ खुद्द नोराने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडिओ शेअर करत तिने नृत्य शिकत असताना आलेल्या समस्या कॅप्शनच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितल्या आहेत. नोराने ‘बाहुबली’, 'स्त्री’ आणि ‘सत्यमेव जयते’ या सारख्या चित्रपटात आयटम साँग केले आहेत. कॅनडाच्या या डान्सरला बिग बॉस या रियॅलटी कार्यक्रमापासून ओळख मिळाली. नोरा नेहमी तिच्या डान्सने प्रेक्षकांवर जादू करते. श्रद्धा कपूर-वरुण धवन यांच्या आगामी ‘स्ट्रीट डान्सर ३’या चित्रपटात दिसणार आहे.