Malaika Arora Honeymoon Photos : अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या रिलेशनशिपमुळे नेहमीच चर्चेत असते. आधी अरबाज खानसोबत (Arbaaz Khan) घटस्फोट (Divorce) आणि त्यानंतर अर्जुन कपूरसोबत (Arjun Kapoor) रिलेशनशिपमुळे ती नेहमीच चर्चेचा विषय ठरते. आपल्या पेक्षा लहान वयाच्या अभिनेत्याला डेट करण्यामुळे ती अनेकदा ट्रोलिंगची शिकारही झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता अभिनेत्री तिचा क्लालिटी टाइम (Quality time) अभिनेता अर्जुन कपूरसोबत स्पेंड करत आहे. दोघंही सध्या बर्लिनमध्ये आहेत. सोशल मीडियाव्दारे दोन्ही कलाकार फोटो शेअर करत आहेत. 


मलायकाने अर्जूनसोबतचे काही फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत, तर दुसरीकडे अर्जुननेही काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यासोबतच या कपलचे चाहते त्यांच्या व्हेकेशनच्या आणखी फोटोंची आतुरतेने वाट पाहत आहेत. आजकाल अर्जुन कपूर आणि मलायका यांच्या लग्नाची चर्चा जोरादार सुरू आहे. 


या फोटोंमध्ये मलायकाची बिंधास्त आणि हटके स्टाईल पाहायला मिळत आहे. पण सध्या मलायकाच्या हनिमुनची होतेय. आणि गंमतीचा भाग म्हणजे अभिनेत्रीने हे हनिमून ना अर्जूनसोबत ना अराबाजसोबत साजर केलंय. तर तिने हे हनिमून तिच्या एका खास व्यक्तीसोबत साजर केलंय. 


मलायकाने तिच्या हनीमूनचे फोटो इतर कुणासोबत शेअर केले आहेत. नुकतीच मलाकाने इंस्टाग्रामवर काही फोटो स्टोरीमध्ये शेअर केले होते.  या फोटोत तिने त्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मलायकाने नुकतेच तिच्या बेस्ट फ्रेंडला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि तिच्यासोबतच्या व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत. मलायका आणि तिच्या मैत्रिणीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.



तुर्की व्हेकेशनच्या या फोटोंना हनीमून म्हणत मलायकाने तिच्या मैत्रिणीला शुभेच्छा दिल्या आहेत. तिची ही फनी पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.  मलायका इंस्टाग्राम स्टोरीद्वारे अर्जुन कपूरसोबतच्या तिच्या व्हेकेशनचे अपडेट्सही देत ​​आहे. अर्जून-मलायकाचे चाहते हे कपल कधी लग्नबंधनात अडकणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत.