Esha Deol : बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल ही सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिच्या घटस्फोटापासून सगळ्या गोष्टी या चर्चेत राहिल्या आहेत.  तिचं लग्न आणि त्यानंतर 12 वर्षाचा सुखी संसार या सगळ्यानंतर आता ईशा तिच्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. पण तुम्हाला माहितीये का? ईशानं भरत नाही तर अभिषेक बच्चनसोबत लग्न करावं अशी इच्छा तिची आई हेमा मालिनी यांची इच्छा होती. पण त्या नात्याला ईशानं नकार दिला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2012 मध्ये ईशानं भरतसोबत प्रेम विवाह केला. त्यानंतर जवळपास 12 वर्ष त्यांचा सुखी संसार सुरु होता. त्यांना दोन मुली आहेत. त्यांच्या संसारात काही अडचणी असतील असं कोणालाही लांबून वाटलं नाही. त्या दोघांनी अचानक एक स्टेटमेंट जाहिर करत विभक्त होत असल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर ईशानं भरतसोबत लग्न करु नये अशी हेमा मालिनी यांची इच्छा असल्याचं म्हटलं होतं. ईशा आणि अभिषेकचं लग्न व्हायला हवं असं वाटत असताना हेमा मालिनी यांनी चक्क अमिताभ बच्चन यांच्याशी बोलणं देखील केलं होतं, असे म्हटले जाते. दरम्यान, ईशाला हे नातं मान्य नव्हतं. ईशानं सांगितलं की ती अभिषेकला मोठ्या भावाप्रमाणे मानते, त्यामुळे त्याच्याशी लग्न कसं करणार असं कारण देत ईशानं अभिषेकसोबतच्या लग्नाला नकार दिला होता. तर त्या दोघांच्या लग्नाचा विषय एका दिवसात संपला होता. त्यानंतर काही दिवसात ईशानं हेमा मालिनी यांनी भरतविषयी सांगितलं. अखेर 2012 मध्ये त्या दोघांनी लग्नगाठ बांधली. 



खरंतर, असं म्हटलं जातं की घटस्फोटाची घोषणा करण्याआधीपासूनच ईशा ही तिची आई हेमा मालिनी यांच्यासोबत राहते, असं म्हटलं जातं. तर फक्त ईशा नाही तर तिच्यासोबत तिच्या दोन्ही मुली देखील हेमा मालिनी यांच्या घरी राहत आहेत. तर लवकरच ईशा तिच्या कामाला सुरुवात करणार आहे. या सगळ्यात आता अशी चर्चा आहे की ईशाला घटस्फोटानंतर खूप मोठी पोटगी देखील मिळू शकते. 


हेही वाचा : 'वडिलांना कंटाळलो, घरात 3 बहिणी...': एकदा रेल्वे ट्रॅकवर आयुष्य संपवायला निघालेले जॉनी लिव्हर


दरम्यान, ईशा देओल आणि अभिषेक बच्चननं अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यात एलओसी-कारगिल, धूम, दस आणि युवा हे चित्रपट आहेत.