आज 5 फेब्रुवारी अभिषेक बच्चनसाठी मोठा दिवस आहे. त्याचं कारण म्हणजे त्याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं कुटुंबातील सदस्यांपासून त्याच्या चाहत्यांपर्यंत सगळेच सोशल मीडियावर त्याला शुभेच्छा देत आहेत. सगळ्यांचं लक्ष हे श्वेतानं वेधलं आहे. श्वेतानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अभिषेकचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याची चर्चा सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्वेतानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत श्वेता आणि अभिषेक दिसत आहेत. श्वेतानं त्या दोघांचा लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत ते दोघं सोफ्यावर बसल्याचे पाहायला मिळते. तर हा फोटो शेअर करत श्वेता म्हणाली, दिसतं तसं नाही... तुम्हाला जर काही माहित असेल तर तुम्ही ओळखू शकता. त्यातही हे फक्त तुला आणि मलाच माहित आहे. तुझ्यासाठी असलेला हा सगळ्यात मोठा दिवस आहे. माझ्या छोट्या भावा, मला आशा आहे की तुला गाणं आवडलं असेल. खूप खूप प्रेम. 



फक्त श्वेता नाही तर नव्या नवेली नंदानं देखील अभिषेकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नव्यानं तिच्या स्टोरीवर एक फोटो शेअर करत तिचा मामा अभिषेकला शुभेच्छा देत कॅप्शन लिहिले की, 'सगळ्यांच्या लाडक्याला आणि त्यातही माझ्या आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.' 



कपडे घेण्यासाठी नव्हते पैसे!


गलाट्टा प्लसनं दिलेल्या मुलाखतीत अभिषेकनं त्या काळाविषयी सांगितलं जेव्हा अवॉर्ड शोमध्ये जाण्यासाठी कपडे खरेदी करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसायचे. याविषयी सांगत अभिषेक म्हणाला होता की "20 वर्षांपूर्वी अनेक महिन्यांआधीच ठरवायचे की तुम्ही काय परिधान करणार आणि त्या काळात कोणी फ्रीमध्ये कपडे देत नव्हतं. तुम्हाला हे सगळे कपडे स्वत: खरेदी करावे लागत होते. आता हे बोलायला विचित्र वाटतं पण माझ्याकडे इतके कपडे देखील नव्हते, आम्ही खरेदी करू शकत नव्हतो. त्याकाळात आम्ही वाईट काळातून जात होतो. त्यामुळे आम्ही खर्च करताना फार विचार करायचो, गरजेच्याच वस्तू खरेदी करायचो." याशिवाय अभिषेकनं हे देखील सांगितलं की एका कार्यक्रमात त्यानं ती शेरवानी परिधान केली होती जी त्यानं श्वेता नंदाच्या लग्नासाठी शिवली होती.


आर्थिक परिस्थिती बिकट होताच सोडलं कॉलेज


अभिषेकनं हे देखील सांगितलं की जेव्हा त्याचे वडील अमिताभ बच्चन आर्थिक तंगीचा सामना करत होते. हे कळताच अभिषेकनं कॉलेज सोडलं आणि परत आला. त्याविषयी सांगताना अभिषेक म्हणाला होता की "त्याच्या वडिलांनी एक कंपनी सुरु केली होती. त्या कंपनीचा तोटा होत होता म्हणून त्यामुळे मला जाणवलं की या कठीण काळात मी त्यांच्या आसपास राहणं गरजेचं आहे. त्यामुळे मी शिक्षण सोडून परत आलो."


अभिषेकच्या नेटवर्थ विषयी बोलायचे झाले तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिषेक बच्चन जवळपास 28 मिलियन डॉलर म्हणजेच 203 कोटींचा मालक आहे.