Highest Paid Actress in 80-90s : बॉलिवूडमध्ये आजही अभिनेत्री या अभिनेत्यांपेक्षा कमी मानधन घेतात. मात्र, आता हळू-हळू ही परिस्थितीती बदलत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचं कारण म्हणजे वर्षोंवर्ष सुरु असलेली परंपरा ही अखेरीस बदलताना दिसते. 80-90 च्या दशकात तर ही खूप साधारण गोष्ट होती. पण तुम्हाला माहितीये का? त्या काळातही एक अभिनेत्री ही सगळ्यात जास्त आणि त्यातल्या त्यात अभिनेत्यां पेक्षा जास्त मानधन घेत होती. इतकंच नाही तर त्या अभिनेत्रीनं थेट अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यास देखील नकार दिला होता. तुम्हाला ही प्रश्न पडला आहे ना की कोण आहे ही अभिनेत्री... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून श्रीदेवी आहेत. श्रीदेवी यांनी वयाच्या चौथ्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तर तब्बल 50 वर्ष चित्रपटसृष्टीत काम केलं. श्रीदेवी या त्या काळातील सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या. श्रीदेवी या बॉलिवूडमधील पहिल्या अशा अभिनेत्री होत्या. ज्या 1 कोटी मानधन घ्यायच्या. त्या काळात काही ठरावीक कलाकारांना कोटींच्या घरात मानधन मिळायचे. 


पहिल्याच चित्रपटानं जिंकली मनं


श्रीदेवी यांनी 'सोलहवां सावन' या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. श्रीदेवी यांनी या चित्रपटातून बॉक्स ऑफिसला हादरवून टाकलं होतं. तिकिट मिळवण्यासाठी मारामारी सुरु होती. 


हेही वाचा : घटस्फोटाच्या चर्चां खोट्या! अभिषेकच्या टीमला चीअर करताना दिसली ऐश्वर्या


1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'खुदा गवाह' या अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटासाठी श्रीदेवी यांना विचारणा करण्यात आली होती. पण त्या आधी अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटात अभिनेत्री एक्स्ट्रा पेक्षा जास्त काही नसतात. मात्र, त्यांनी या चित्रपटाला नकार दिला. श्रीदेवी यांनी 300 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी फक्त हिंदी नाही तर तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषिक चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. तर सलमान खानला देखील त्यांच्यासोबत काम करायला भीती वाटत होती. श्रीदेवी या कधीच त्यांचे चित्रपट पाहायच्या नाही. त्याचा खुलासा त्यांची लेक आणि अभिनेत्री जान्हवी कपूरनं एका कार्यक्रमात केला होता.