मुंबई : लोकप्रिय शायर आनंद मोहन जुत्शी उर्फ गुलजार देहलवी यांच शुक्रवारी नोएडा येथील कैलास रूग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. गेल्या रविवारी गुलजार हे ग्रेटर नोएडाच्या शारदा रूग्णालयातून कोरोनाशी युद्ध जिंकून घरी परतले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र शुक्रवारी दुपारी गुलजार देहवली यांची अचानक तब्बेत बिघडली. त्यानंतर कुटुंबियांनी त्यांना कैलास रूग्णालयात दाखल केलं. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. 



आनंद मोहन यांचा जन्म ७ जुलै १९२६ रोजी झाला आहे. उर्दू शायरी आणि साहित्यमध्ये त्यांच मोठं योगदान आहे. गुलजार यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं आहे. २००९ मध्ये त्यांना मीर तकी मीर या पुरस्काराने देखील सन्मानित केलं आहे. 



 सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. दिल्लीतही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे दिल्लीत अतिशय चिंताजनक वातावरण आहे. दरम्यान दिल्लीत लॉकडाऊन वाढवण्यात येणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. परंतु आता दिल्लीत लॉकडाऊन वाढणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिल्लीत लॉकडाउन वाढवला जाणार नसल्याचं सांगितलं आहे. एएनआयशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.