आता साफसफाईची वेळ आली आहे, ड्रग्ज प्रकरणावर रवीना टंडनची प्रतिक्रिया
अभिनेत्री रवीना टंडननेही या प्रकरणांवर आता मौन सोडलं आहे.
मुंबई : एनसीबीच्या चौकशीत बॉलिवूडमधील बड्या दिग्गज व्यक्तींची नावे ड्रग्ज कनेक्शनमध्ये उघडकीस येत आहेत. दीपिका पादुकोणपासून सारा अली खानपर्यंत अनेक नावे पुढे आली आहेत. अभिनेत्री रवीना टंडननेही या प्रकरणांवर आता मौन सोडलं आहे. दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, असा रोष तिने व्यक्त केला.
रवीनाने ट्विट केले की, 'आता साफसफाईची वेळ आली आहे. स्वागत आहे! आमच्या आगामी पिढीला मदत होईल. येथून प्रारंभ करा, नंतर इतर क्षेत्रात जा. मुळापासून उपटा. दोषी, घेणारे, विक्रेते, पुरवठा करणाऱ्यांना शिक्षा द्या. मोठे लोक फायदा घेत आहेत, जे इतरांकडे पाहत नाहीत आणि आपले आयुष्य खराब करतात.' रवीना टंडनची ही पोस्ट ना कोणाचं समर्थन करत ना कोणाला विरोध. रवीनाने तटस्थ भूमिका घेत या प्रकरणावर आपली बाजू मांडली आहे.
विशेष म्हणजे ड्रग्ज प्रकरणाबाबत बॉलिवूड कलाकार चर्चेत आहे. फिल्म इंडस्ट्रीची अनेक नावे समोर आल्यानंतर लोकं बॉलिवूडमधील सर्व कलाकारांकडे आता संशयाच्या नजरेने पहात आहेत. जया बच्चन, तापसी पन्नू, अनुराग कश्यप, अनुभव सिन्हा, मनोज बाजपेयी यांच्यासह अनेक कलाकारांनी ड्रग्जच्या मुद्दयाला विरोध दर्शवत असे म्हटले होते की, सर्व जण ड्रग्ज घेत नाहीत. त्याचबरोबर काही सेलिब्रिटींचे म्हणणे आहे की, बॉलिवूडचे अर्ध्याहून अधिक लोकं मादक पदार्थांचे व्यसन करतात.