अनुरागबद्दल बोलायला ६ वर्ष का लागली ? पायल घोष म्हणते...
पायल घोष इतके दिवस गप्प का बसली ? असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय.
नवी दिल्ली : अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप केलाय. यानंतर सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरु झालीय. अभिनेत्री कंगना राणौतने अनुरागच्या अटकेची मागणी केलीय. अनुराग कश्यपने माझ्यावर जबरदस्ती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती की त्यांनी यावर कारवाई करायला हवी. ज्यामुळे देशासमोर सत्य येईल. हे बोलणं माझ्यासाठी नुकसान देणार आहे. माझी सुरक्षा धोक्यात आहे. कृपया माझी मदत करा असं तिने म्हटलंय. दरम्यान पायल घोष इतके दिवस गप्प का बसली ? असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय.
मी अनेकदा यासंदर्भात ट्वीट केलं आणि डिलीट केलं. ट्वीट डिलीट कर असे माझ्या मॅनेजरने भावाला सांगितले. हे सारे माझे हितचिंतक आहेत. माझी फॅमिली संकुचित आहे. ती मला सपोर्ट करणार नाही. हे सर्व सोड आणि घरी चल असे ते म्हणतील. पण अनुरागने मला सॉरी म्हटलं असत तर बरं झालं असतं.
कोणाची हिम्मत होत नाही हे बोलण्याची. मला हे बोलायला ६ वर्ष लागली. बॉलीवुडमध्ये सर्वजण वाईट नसतात. सर्वजण ड्रग्ज घेतात असं नाही पण कोणीच ड्रग्ज घेत नाही असेही नाही.
महिला आयोग साथीला
पायल घोषच्या साथीला राष्ट्रीय महिला आयोग धावली आहे. काल रात्री पायल घोषने ट्वीट करत २०१५ साली अनुराग कश्यपने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे म्हटले. जर ती तक्रार करणार असेल तर महिला आयोग तिच्यासोबत आहे असे अध्यक्षा रेखा शर्मा यांनी म्हटलंय. पायल घोषने अनुराग कश्यपविरोधात केस दाखल केलेली नाही. परंतु राष्ट्रीय महिला आयोगच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी पायलकडे याबाबत संपूर्ण माहिती मागितली आहे. ज्याद्वारे त्या या प्रकरणात कारवाई करु शकतील.
अनुराग कश्यपवरील आरोपांनंतर कंगनाने पायलच्या समर्थनार्थ ट्विट केलं आहे. कंगनाने #MeToo हा हॅशटॅग वापरत, अनुराग कश्यपच्या अटकेची मागणी केली आहे. यापूर्वीही सुशांत प्रकरणावरुन कंगना आणि अनुराग कश्यप यांच्यात ट्विटरवॉर पाहायला मिळाला होता.
पायल घोष आहे तरी कोण?
पायल घोष एक अभिनेत्री आहे. जिने दक्षिण आणि हिंदी सिनेमात काम केलं आहे. पायल घोषने २०१७ मध्ये ऋषि कपूर यांच्या 'पटेल की पंजाबी शादी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. कोलकाताची राहणारी पायलने 'सेंट पॉल्स मिशन' शाळेल शिक्षण तर स्कॉटिश चर्च कॉलेजमधून पदवीचं शिक्षण घेतलं. सध्या ती मुंबईत राहत आहे.
१७ व्या वर्षी पायल घोषने बीबीसीच्या टेलीफिल्म Sharpe's Peril मध्ये काम केलं आहे. ती या सिनेमांकरता एका मित्रासोबत गेली होती आणि सिलेक्ट झाली.
इंग्रजी सोल्जर Richard Sharpe यांच्यावर आधारित असलेल्या या सिनेमात पायलने बंगालमधील एका स्वातंत्र्य सेनानीच्या मुलीची भूमिका साकारली होती. जी गावात राहणारी मुलगी आहे.
तसेच पायलने एका कॅनेडियन सिनेमांतही काम केलं होतं. ज्यामध्ये तिने एका शाळेच्या मुलीची भूमिका साकारली होती. या मुलीने आपल्या शेजारच्या नोकराशी प्रेम केलं होतं.
पायलच्या आई-वडिलांनी तिने सिनेमांत काम करावं असं वाटत नव्हतं. यामुळे कॉलेजच्या सुट्यांमध्ये ती कोलकातावरून मुंबईला धावत आली होती. त्यानंतर मुंबईत नावांकित किशोर ऍक्टिंग अकॅडमी जॉईन केली. तिथेच पायलची ओळख चंद्रा शेखर येलेती यांच्याशी झाली. ज्यांनी पायलला तेलुगू सिनेमा Prayanam काम केलं आहे. या सिनेमात तिच्यासोबत मंछु मनोजने काम केलं आहे.