मुंबई : सध्या देशभरात दुर्गापूजेची धामधूम सुरू आहे. अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी नुकतच पती निखिल जैनसोबत देवीची आराधना केली. पश्चिम बंगालच्या खासदार नुसरत जाहाँ यांचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांचे पती ढोल वाजवताना दिसत आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुसरत जाहाँ दुर्गापूजेच्या निमित्ताने तालावर थिरकताना दिसत आहेत. पतीसह दुर्गापूजेसाठी आलेल्या ग्लॅमरस खासदार नुसरत जहाँ यांनी यावेळी पारंपरिक वाद्य वाजवत या उत्सवाचा आनंद घेतला. त्याचप्रमाणे पारंपरिक वेशभूषेत त्या अत्यंत सुंदर दिसत होत्या. 


व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे. संसदेत पाश्चिमात्य पेहरावात जाण्यासाठी त्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या होत्या. धर्मच्या मुद्द्यावरुन होणारे हे वाहद पाहता नुसरत यावर कशी व्यक्त होते हे पाहणं महत्त्वाचं आहे.