इस्रायल-हमास युद्धात उतरणार नुसरत भरुचासोबत काम करणारा `हा` अभिनेता
Nushrat Bharucha Israeli Hamas war : नुसरत भरुचासोबत काम केलेल्या `या` अभिनेत्यानं घेतला मोठा निर्णय! इस्रायल-हमास युद्धात उतरणार
Nushrat Bharucha Israeli Hamas war : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धाची संपूर्ण जगात चर्चा सुरु आहे. या युद्धात अनेक लोक अडकले होते. त्यात बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा देखील या युद्धात अडकली होती. मात्र, नुसरत भारतात सुखरुप परतील हे ऐकल्यानंतर तिच्या अनेक चाहत्यांना आनंद झाला होता. या सगळ्यात आता चर्चा सुरु आहे की नुसरतचा सहकलाकार त्साही हलेवीनं इस्रायल आणि हमासच्या युद्धात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्साही हा इस्रायल सैन्याचा भाग होण्याचा निर्णय घेतला आहे.
त्साही हलेवी हा इस्रायलचा अभिनेता आहे. त्यानं नुसरतसोबत ‘अकेली’ या बॉलिवूड चित्रपटात काम केलं होतं. तोच त्साही आता बॉर्डर पोलिसांच्या रिजर्व डिव्हीजन, इनबार यूनिट जॉइन केली आहे. त्साहीनं त्याच्या अभिनय क्षेत्रातील करिअरमध्ये सेनेत असलेल्या जवानची भूमिका साकारली आहे. आता त्साही खऱ्या आयुष्यात देखील शत्रूंपासून त्याच्या देशाला वाचवण्यासाठी तयार आहे. अकेलीचे निर्माते निनाद वैद्य यांनी त्साही हवेली हा सैन्यात भरती झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. त्साहीनं फौदा आणि द कॉप्समध्ये इस्रायलच्या सिक्टोरिटी फोर्सचा मेंबरची भूमिका साकारली होती. त्साही त्याच्या ‘अकेली’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भारतात देखील आले होते.
नुसरत भरुचा हाइफा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी इस्रायल गेली होती. त्याच दरम्यान, हमासच्या दहशतवादींनी इस्रायलावर हल्ला केला. यावेळी नुसरतचा तिच्या टीमसोबत संपर्क होत नव्हता. मात्र, काही दिवसांनंतर तिला सुरक्षित भारतात आणण्यात आले. विमानतळावरील तिचे अनेक व्हिडीओ समोर आले होते. त्यात नुसरत या सगळ्या प्रकरणामुळे किती घाबरली होती हे स्पष्ट दिसत होती. तिला कसं तरी तिच्या घरी पोहोचायचे होते हे त्यातून दिसले.
हेही वाचा : Sing and Drive मुळे ट्रोल झालेल्या मुग्धा-प्रथमेशचा कारमधील आणखी एक Video Viral
नुसरतनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती म्हणाली होती की 'ज्यांनी मी सुखरुप रहावे यासाठी प्रार्थना मागितली त्या सगळ्यांचे मला आभार मानायचे आहे. मी परतले आहे. घरीच आहे आणि सुरक्षित आहे. मी ठीक आहे. पण दोन दिवस आधी जेव्हा हॉटेलच्या रूममध्ये उठले तेव्हा माझ्या आजुबाजूला बॉम्ब ब्लास्टचा आवाज येत होता.'