मुंबई : अभिनेत्री नुसरत भरूचाची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून स्थिर नव्हती. तरी देखील नुसरत ब्रेक न घेता शूटींग पूर्ण करण्याचं काम करत होती. अशात शूटींगदरम्यान नुसरतची प्रकृती बिघडली. तिला सध्या मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. नुसरत गेल्या काही दिवसांपासून मुंबईत लव रंजन (Luv Ranjan) चित्रपटाची शूटींग करत होती. जोपर्यंत लव रंजन चित्रपटाची घोषणा करत नाहीत तोपर्यंत चित्रपटाबद्दल सर्व माहिती गुपित ठेवण्याची इच्छा नुसरतची होती. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण अचानक प्रकृती बिघडल्यामुळे चित्रपटाच्या चित्रीकरणाला ब्रेक लागला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीप्रमाणे नुसरतला वर्टिगो अटॅक आला आहे. वर्टिगो अटॅक जास्त ताण घेतल्यामुळे येतो. नुसरत म्हणाली, 'मी शूटींगदरम्यान एका हॉटेलमध्ये थांबली होती. हॉटेल सेटच्या जवळचं होता.'


पुढे नुसरत म्हणाली, 'सलग तीन आठवडे काम करत असल्यामुळे मला फार अशक्त वाटत होतं. ज्यानंतर मी सुट्टी घेतली. मला असं वाटलं एक दिवस आराम केल्यानंतर ठिक वाटेल. पण प्रकृती अधिक बिघडली. त्यानंतर मला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.'