मुंबई : टीएसीची खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहां आणि निखिल जैन यांच्यातील वाद काही थांबण्याच नाव घेत नाही. दोघंही एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. नुसरत जहांच्या धक्कादायक खुलाशानंतर निखिल जैनने पहिल्यांदा मोठा खुलासा केला आहे. (Nusrat-Nikhil Controvarcy : Nikhil Jain gave hint of Nusrat Jahan affair with Yas Dasgupta in statement ) यावेळी जवळपास नऊ मुद्यांमध्ये निखिल जैनने आपलं मत मांडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निखिलने नुसरत आणि यश दासगुप्ता यांच्यात अफेअर असल्याचा इशारा दिला आहे. मात्र त्याने स्पष्टपणे यशचं नाव घेतलं नाही. मात्र काहीही न बोलता निखिलने याच कारणामुळे आपल्या विवाहित जीवनात वाद निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. 



यशसोबत नुसरतचा सिनेमा प्रदर्शित 


निखिल जैनने दिलेल्या माहितीनुसार, 2020 च्या ऑगस्ट महिन्यात एका सिनेमाच्या शुटिंग दरम्यानच नुसरतच्या स्वभावात बदल झाला. याचं कारण मात्र फक्त नुसरतला माहित आहे. माझ्या पत्नीच्या स्वभावात एवढा बदल झाला की, मला विश्वासच बसला नाही. हा सिनेमा यश दासगुप्तासोबत रिलिज होणार होता. दोघं मिमी चक्रवर्तीसोबत लीड रोलमध्ये दिसले. 'एसओएस कोलकाता' असं त्या सिनेमाचं नाव होतं. नुसरत आणि यश दोघंही सिनेमाच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त होते. दोघांचे एकत्र अनेक फोटो देखील होते.  



नुसरत आणि यश दासगुप्ता यांनी सिजलिंग फोटोशूट केलंय. ज्यामध्ये दोघांमधील जवळीक आणखी वाढली. नुसरतने यशसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. याचदरम्यान या दोघांमध्ये जवळीक वाढली. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांनी खूप पसंत केली.


निखिल जैनने आणखी एक धक्कादायक खुलासा केला. लग्न रजिस्टर करण्यास मी अनेकदा तगादा लावलं मात्र नुसरत कायमच ही गोष्ट नाकारत राहिली. 5 नोव्हेंबर 2020 रोजी नुसरत आपली बॅग आणि काही सामान घेऊन आपल्या फ्लॅटवर शिफ्ट झाली. यानंतर आम्ही वेगळे झालो. ती आपल्यासोबत सर्व खासगी गोष्टी, महत्वाचे कागदपत्रे घेऊन गेले.