मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील  घराणेशाहीवर अनेकांनी निशाणा साधला आहे. सुशांतची आत्महत्या नव्हे तर बॉलिवूडमध्ये असलेल्या घराणेशाही आणि गटबाजीमुळे त्याची हत्या झाल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगली होती. दरम्यान प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीचा एक जुना व्हिडिओ तुफान  व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये जेव्हा अभिनेत्री सारा अली खान रोहितकडे काम मागण्यासाठी आली होती, तेव्हा त्यांच्यात झालेल्या संभाषणाबद्दल रोहितने स्पष्टीकरण दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'केदारनाथ' चित्रपटाच्या माध्यमातून साराने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तिला 'सिम्बा' चित्रपटाच्या माध्यामातून प्रचंड लोकप्रियता मिळाली. दरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता रणवीर सिंग, सारा अली खान आणि रोहित शेट्टी द कपिल शर्मा शोमध्ये पोहोचले होते. 
 



यावेळी साराला 'सिम्बा' चित्रपटात साराला एन्ट्री कशी मिळाली याचा खुलासा खुद्द रोहितने केला. 'एक दिवस सारा माझ्या ऑफिसमध्ये एकटी आली आणि मला काम द्या असं म्हणाली. तेव्हा माझ्या डोळ्यात अक्षरश: आश्रू आले.' असं या व्हिडिओमध्ये रेहित बोलताना दिसत आहे. 


यावरून आता सोशल मीडियावर साराला ट्रोल करण्यात येत आहे. सारा लवकरच 'कुली नं. १' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. पहिल्यांदाचं ती आणि अभिनेता वरूण धवन स्क्रिन एकत्र शेअर करताना दिसणार आहेत. 


दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता 'कुली नं.१' चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. कोरोना व्हायरच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या काही दिवसांपासून अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत.