मुंबई : अभिनय आणि संगीत विश्वाला मोठा धक्का बसला आहे, कारण गायिका आणि अभिनेत्री ओलिव्हिया न्यूटन जॉन (Olivia Newton John) यांचं निधन झालं आहे. त्या 73 वर्षांच्या होत्या. त्यांच्या ‘Physical’, आणि ‘You are the One That I want’ गाण्यांनी तर चाहत्यांना थिरकण्यासाठी भाग पाडलं. ओलिव्हिया यांच्या निधनानंतर फक्त चाहत्यांमध्येच नाही तर, अभिनय आणि संगीत विश्वात देखील मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच अनेकांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओलिव्हिया न्यूटन जॉन यांच्या निधनाची माहिती पती जॉन ईस्टलिंग यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. ओलिव्हिया न्यूटन जॉन यांचा एक फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये, 'ओलिव्हिया न्यूटन जॉन याांचं कॅलिफोर्निया येथे आज (मंगळवार) निधन झालं आहे...'



पुढे जॉन ईस्टलिंग म्हणाले, 'शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत कुटुंब आणि मित्रपरिवार होता. आमची तुम्हा सर्वांना विनंती आहे, कृपया आमच्या गोपनियतेचा आदर करा..' सध्या त्यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


कर्करोगामुळे ओलिव्हिया न्यूटन जॉन यांचं निधन
गेल्या 30 वर्षांपासून ओलिव्हिया न्यूटन जॉन कर्करोगाशी झुंज देत होत्या. ऑलिव्हिया न्यूटन जॉन फाउंडेशन फंड चालवत होत्या, जे वनस्पती औषध आणि कर्करोग संशोधनावर काम करत आहे. अशी माहिती देखील ऑलिव्हिया यांच्या पतीने दिली आहे. 


ऑलिव्हिया न्यूटन जॉन 1973-83 मधील जगातील सर्वात लोकप्रिय कलाकारांपैका एक होत्या. 4 वेळा ग्रॅमी अवॉर्ड जिंकणाऱ्या ऑलिव्हिया यांनी वयाच्या 16 व्या वर्षी टॅलेंट शोच्या विजेत्या ठरल्या. त्यानंतर कधीच त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. पण कर्करोगाने मात्र त्यांचा घात केला.