मुंबई : कॉमेडियन भारती सिंहच्या लग्न रितीरिवाजांना सुरूवात झाली आहे. भारती लग्नामुळे चांगलीच उत्साही असून ते तिच्या सोशल मीडिया पेजवरून दिसून येतं. सोमवारपासून वेगवेगळे रिवाज सुरू झाले आहेत. सोमवारी बांगड्या भरण्याचा रिवाज झाला. याचे फोटो तिने सोशल मीडियात शेअर केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


भारतीच्या या रिवाजासाठी तिच्या खास मैत्रीणी आल्या होता. 



यादिवशी भारतीने नीता लूल्ला द्वारे डिझाईन केलेला लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता आणि तिने अनमोलची ज्वेलरी परिधान केली होती. 



या सोहळ्याचा अनेक टिव्ही कलाकारही आले होते. यात अनीता हसनंदानी, माही विज, अदा खान, मोनालिक्सा आणि जिया मानेक यांचा समावेश आहे. 



भारती आणि हर्ष लिंबाचिया यांचं ३ डिसेंबरला लग्न होणार आहे. दोघांचं लग्न गोव्यात होणार असून त्याआधी काही कार्यक्रम मुंबईत होणार आहेत. 




  
भारती आणि हर्ष हे दोघे नच बलियेमध्ये एकत्र दिसले होते. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. 




  
काही दिवसांपूर्वी भारतीने तिच्या इन्स्टाग्रामवर प्री-वेडींग फोटो शूटचे फोटो शेअर केले होते. तेही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते.