OMG 2 actor death: 'ओह माय गॉड 2' हा चित्रपट यावेळी चांगलाच गाजला आहे. या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगलेली होती. 11 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याचवेळी 'गदर 2' हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांची जोरात चर्चा रंगलेली होती आणि या दोन्ही चित्रपटांमध्ये फारच तगडी स्पर्धा होती. परंतु 'गदर' 2 नं चांगली कमाई केली होती. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली होती. सध्या या चित्रपटाची निगडित एक धक्कादायक माहिती समोर येते आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटातून अभिनय केलेले अभिनेते सुनील श्रॉफ यांचे निधन झाले आहे. OMG 2 हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला होता. ते सोशल मीडियावरही फार सक्रिय होते. त्यातून आपल्या अमकमिंग प्रोजेक्ट्ससाठीचेही अपडेट्स ते आपल्या चाहत्यांना देताना दिसायचे. OMG 2 चे अपडेट्सही त्यांनी दिले होते. त्यांनी अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठीसोबतही अनेक फोटो शेअर केलेले होते. 


ज्येष्ठ अभिनेते सुनील श्रॉफ यांच्या निधनानं बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जाते. ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांनी 'शिद्दत', 'द फायनल कॉल', 'कबाड द कॉईन', 'जूली', 'अभय' अशा चित्रपटांतून कामं केली आहे. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. त्यांनी अनेक लोकप्रिय कलाकारांसोबत काम केलं आहे. सोबतच त्यांनी रश्मिका मंदानासोबत एका जाहिरातीतही कामं केले होते. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा रंगलेली होती. ओएमजी हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यातही सापडला होता. त्यामुळे या चित्रपटाचीही विशेष चर्चा रंगलेली होती. त्यातून या चित्रपटावर सेन्सॉरचीही कात्री लागली होती. अशावेळी या चित्रपटाची चारही बाजूंनी चर्चा रंगलेली होती. 2012 साली या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. 


हेही वाचा : जबरा फॅन! भरगच्च थिएटरमध्ये 'जवान' पाहताना मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुफान डान्स


कालच लोकप्रिय अभिनेते रिओ कपाडिया यांच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा पसरली होती. त्यातच आता या नव्या बातमीनंही सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. यावर्षीही बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय तारे हे निखळले होते. सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा आहे ती म्हणजे जवान या चित्रपटाची. हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. पठाणनंतर या चित्रपटानं चांगलाच विक्रम केला आहे. त्यातून शाहरूख खानची चांगलीच चर्चा रंगलेली आहे.