ओंकार राऊत आणि प्रियदर्शनी इंदलकर रिलेशनशिपमध्ये? स्वत: अभिनेत्रीने केला मोठा खुलासा
वनिताच्या लग्नातील प्रियदर्शनी इंदलकर व ओंकार राऊत या दोघांचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला होता. हा फोटो प्रियदर्शनीने तिच्या इंस्टाग्रावर शेअर केला होता. आता अभिनेत्रीने यावर एक मोठा खुलासा केला आहे.
मुंबई : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात हिचा नुकताच विवाहसोहळा पार पडला आहे. 2 फेब्रुवारीला वनिता खरातनं आपला प्रियकर सुमित लोंढेसोबत तिनं लग्न केले. हा लग्नसोहळा मित्रपरिवार आणि नातेवाईकांच्या साक्षीनं पार पडला. वनिताच्या लग्नाचे आणि रिसेप्शनचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
सुमित हा एक व्हिडीओ क्रिएटर आहे. वनिता आणि सुमित एका सहलीला एकत्र भेटले होते. तेव्हापासून ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. या पिकनिकलाच त्यांची घट्ट मैत्री झाली होती. त्यानंतर त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. वनिताच्या लग्नाला हास्य जत्रेच्या टीमनं हजेरी लावली होती.
वनिताच्या लग्नातील प्रियदर्शनी इंदलकर व ओंकार राऊत या दोघांचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला होता. हा फोटो प्रियदर्शनीने तिच्या इंस्टाग्रावर शेअर केला होता. या फोटोत ती ओंकार राऊतला पकडून उभी असल्याचं दिसत आहे. तक ओंकार तिच्याकडे बघत आहे. तर ती कॅमेराकडे बघून स्माईल देत आहे.
एवढंच नव्हेतर तिचा एक हात ओंकारच्या छातीवर आहे. तिच्या आणि ओंकारच्या या फोटोने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता. तर या फोटोवर आस्ताद काळेने कमेंट केली जी आणखीनच चर्चेचा विषय ठरली. या फोटोवर आस्ताद कमेंट करत म्हणाला, 'ज्या पद्धतीने ओंकार तुझ्याकडे पाहत आहे, एकत्र आणि आनंदी राहा मित्रांनो' अशी कमेंट आस्तादने केली.
त्यानंतर ओंकार व प्रियदर्शनीच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. या दोघांनीही या चर्चांवर मौन कायम राखलं. मात्र आता प्रियदर्शनीने स्वतःच ओंकार व तिच्या नात्याबाबत भाष्य केलं आहे.
दिलेल्या एका एमुलाखतीमध्ये प्रियदर्शनीला ओंकारबरोबरच्या नात्याबाबत विचारण्यात आलं. तेव्हा प्रियदर्शनी म्हणाली, ''आस्ताद काळेने आमच्या दोघांच्या फोटोंवर एक कमेंट केली. त्यावर मी गंमतीशीर रिप्लाय केला. पण त्या एका गोष्टीमुळे एवढी चर्चा होईल असं मला खरंच वाटलं नव्हतं. पण असं काहीही नाही. आम्ही दोघं खूप चांगले मित्र आहोत. काम करताना मैत्री वाढत जाते. हे इतकंच आहे. लोकांना आमच्यामध्ये प्रेम दिसत आहे. हे म्हणजे लोकांचंच आमच्यावर असलेलं प्रेम आहे. आमच्यामध्ये फक्त मैत्रीचं नातं आहे.'' प्रियदर्शनीच्या या प्रतिक्रियेनंतर ओंकार आणि तिच्यात फक्त मैत्रीचं नातं आहे हे स्पष्ट होतं.