मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन स्टारर 'सुपर ३०' चित्रपटाच्या कमाईचा आकडा सलग चढत्या क्रमावर आहे. चित्रपटाने १७ दिवसांमध्ये १२५ कोटी रूपयांचा आकडा पार केला आहे. हा चित्रपट १५० कोटींच्या घरात प्रवेश करणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षणाच्या भोवती फिरत असलेल्या चित्रपटाच्या कथेला चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले आहे. अभिनेता हृतिक रोशनच्या भूमिकेला चित्रपट समिक्षकांसह, प्रेक्षकांकडूनही चांगली दाद मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हृतिकने गणिततज्ज्ञ आनंद कुमार यांची साकारलेली व्यक्तीरेखा चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईचे आकडे ट्विटरच्या माध्यमातून शेअर केले आहेत. १९ जुलैला चित्रपटगृहात दाखल झालेल्या 'सुपर ३०'ने १२५ कोटी रूपयांचा गल्ला जमा केला आहे.  



लहान मुलांना सशक्त बनवण्याचा प्रयत्न, लहान डोळ्यांना मोठे स्वप्न पाहाण्यासाठी असलेले अधिकार, कोणत्याही असंभव गोष्टीला संभव करण्याची इच्छा इत्यादी गोष्टींच्या भोवती 'सुपर ३०' चित्रपटाची कथा फिरत आहे.


अभिनेता हृतिक रोशन चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. अभिनेत्री मृणाल ठाकूर देखील चित्रपटात महत्वाची भूमिका बजावत आहे. सुपर ३०'च्या दमदार यशानंतर हृतिक त्याच्या आगामी 'वॉर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 'वॉर'मधून टायगर श्रॉफही अॅक्शन सीन साकारताना दिसणार आहे.