मुंबई : 4 नोव्हेंबर रोजी देशभरात दिवाळी साजरी करण्यात आली. देशातच नव्हे तर परदेशातही राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला. बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियांका चोप्रासाठी ही दिवाळी खास होती. कारण यावेळी प्रियांका चोप्राने निक जोनससोबत नवीन घरात पहिल्यांदाच दिवाळी साजरी केली. ज्याचे फोटोही प्रियांकाने शेअर केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियंका चोप्राने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हे अतिशय सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रियांका चोप्रा पती निक जोनाससोबत LA मधील तिच्या नवीन घरात दिवाळी साजरी करताना दिसली. या खास प्रसंगी प्रियंका चोप्राने तिचे नवीन घर नव्या नवरीसारखे सजवले. फुलांच्या आणि दिव्यांच्या प्रकाशाने तिने घर उजळून टाकले.


या खास प्रसंगी प्रियांका चोप्राने लेहेंगा परिधान केला होता. तर तिचा पती निक जोनस याने लाल कुर्ता परिधान केला होता. हे फोटो शेअर करत प्रियंका चोप्राने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आमची पहिली दिवाळी एकत्र आमच्या पहिल्या घरात. हे नेहमीच खास असेल. आजची संध्याकाळ खास बनवण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे खूप खूप आभार. तुम्ही माझे सर्व देवदूत आहात.



तुम्ही आमच्या घराचा आणि माझ्या संस्कृतीचा केवळ पेहराव करूनच नाही तर सन्मान ही केलात, मी माझ्या घरी आले आहे, याची जाणीव करून दिली.