मुंबई : 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेमुळे टीव्ही अभिनेत्री शिवांगी जोशी आता घरोघरी ओळखली जाते. अलीकडेच, अभिनेत्रीने या मालिकेचा निरोप घेतला आहे आणि यावेळी ती दुबईमध्ये धमाल करत आहे. शिवांगी जोशी सतत तिच्या व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवांगी जोशी तिची खास मैत्रिण आणि सेलिब्रिटी स्टायलिस्ट नेहा अद्विक महाजनसोबत आहे. दिवाळीच्या खास निमित्त शिवांगी जोशीचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये शिवांगी जोशीने ब्राईडल लूक केल्याचं दिसून येत आहे.


शिवांगीचा हा व्हिडिओ व्हायरल 


आता शिवांगी जोशीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम शिवांगी जोशी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या एका प्रसिद्ध डायलॉगवर लिपसिंग करताना दिसत आहे. शिवांगी जोशीचा हा ब्राईडल अवतार व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


त्यामुळे अनेकांनी तिला लाईफ पार्टनर कोण आहे, लग्न कधी करते आहेस ?, असे प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे.