Lakme Fashion Week: रॅम्पवर अभिनेत्रीने लेहंगा सावरला म्हणून...
अभिनेत्रीला oops मुव्हमेंटला सामोरं जावं लागलं.
मुंबई : मुंबईत सुरु असलेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये विविध फॅशन डिझायनर आपलं कलेक्शन सादर करतात. या कलेक्शनसाठी खास शो स्टॉपर म्हणून बॉलिवूड अभिनेत्रीही रॅम्पवर हजेरी लावतात. फॅशन वीकच्या पाचव्यादिवशी KRSNA COUTUREचं (क्रीस्ना कोचर) खास वनपीस, लेहंगा कलेक्शन सादर करण्यात आलं. मात्र यावेळी शो स्टॉपर म्हणून अभिनेत्री आणि टी-सीरीजचे चेअरमन, एमडी असलेल्या भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला-कुमारला ऊप्स (oops) मुव्हमेंटला सामोरं जावं लागलं. मात्र दिव्याने दाखवलेल्या आत्मविश्वासामुळे तीने ती वेळ चांगलीच निभावून नेली.
लॅक्मे फॅशनवीकमध्ये अभिनेत्री दिव्या खोसला-कुमार रॅम्पवर अवतरली. तिने परिधान केलेला लेहंगा आणि तिच्या सौंदर्यामुळे साऱ्यांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या. मात्र तिची एन्ट्री होताच तिला ऊप्स मुव्हमेंटला सामोरं जावं लागलं. रॅम्पवर चार पावलं चालते ना चालते तोच दिव्याने घातलेल्या फॉसिल ग्रे रंगाच्या लेहंगाचं साईड बटण निघालं. तरी जराही आत्मविश्वास न डगमगता आपल्या हाताने लेहंगा घट्ट धरत तिने पुन्हा रॅम्प वॉक करायला सुरुवात केली.
थोडसं पुढे जाताच काहीशी अडखळली, मात्र तरीही ती डगमगली नाही. जेव्हा तिच्या फॅशन डिझायनर रॅम्पवर अवतरल्या तेव्हा चक्क त्यातल्या एकीने तिचा लेहंगा पकडण्याचं काम केलं आणि पुन्हा एकदा तिघींनी रॅम्प वॉक केला. मात्र एवढं होऊनही यावेळी तिच्या चेहऱ्यावरचं हास्य जराही हटलं नाही.
आपल्या फॅशन डिझायनरची गळाभेटही तिने याचं उप्स मूव्हमेंट वेळी घेतली. मात्र यावेळीही तिच्या दोन्ही फॅशन डिझायनर्सनी तिला सांभाळलं. म्हटलं तर हा वॉर्डरोप मालफंक्शनचाच प्रकार होता. मात्र दिव्या मोठ्या आत्मविश्वासाने याला सामोरी गेली. आणि म्हणूनच रॅम्प वरच्या तिच्या उप्स मूव्हमेंटपेक्षाही तिने आत्मविश्वासाने सादर केलेला तिचा रॅम्प वॉक जास्त आकर्षित करून गेला.