मुंबई : जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. या हल्ल्यात ४०हून अधिक जवान शहीद झाले. या भ्याड हल्ल्याचा संपूर्ण देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. देश तसंच विदेशातूनही शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. परदेशात सुरू असलेल्या 'स्ट्रीट डांन्सर'च्या टीमनेही लंडनमध्ये या हल्ल्यानंतर शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पुलवामामधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा बॉलिवूडमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. चित्रपट 'एबीसीडी'चा सिक्वेल 'स्ट्रीट डान्सर'च्या टीमने या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. वरूण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्या आगामी 'स्ट्रीट डान्सर'च्या सेटवरही चित्रपटाच्या संपूर्ण टीमकडून शोकसभा ठेवण्यात आली. शोकसभेत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या शोकसभेचे काही फोटो सोशल मीडियावरून समोर आले आहेत. अभिनेता वरूण धवनने हल्ल्यानंतर इंन्स्टाग्रामवरून भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 



लंडनमध्ये 'स्ट्रीट डान्सर' चित्रपटाचे शूटींग सुरू आहे. याआधी पंजाबमध्ये चित्रपटाचा काही भाग शूट करण्यात आला आहे. आता पुढील चित्रपटाचे शूटींग लंडनमध्ये  सुरू आहे. 'एबीसीडी'चा सिक्वेल असणाऱ्या 'स्ट्रीट डान्सर'मध्ये वरूण धवन आणि श्रद्धा कपूर प्रमुख भूमिका साकारणार असून त्यांच्यासोबत अभिनेत्री नोरा फतेहीदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ८ नोव्हेंबर २०१९ रोजी 'स्ट्रीट डान्सर' प्रदर्शित होणार आहे.