Sharad Kelkar Open Up About His Struggle : अभिनेता शरद केळकर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अभिनेता शरद केळकर सध्या त्याच्या करिअरच्या उंचीवर आहे. त्याच्य प्रत्येक पात्रात तो जीव ओतून काम करतो. त्याच्या प्रेत्यक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. लक्ष्मी सिनेमा शरदने ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचबरोबर त्याने रामलीला सिनेमातही महत्वपूर्ण पात्र साकारलं होतं. मात्र तुम्हाला माहितीये का? की, आज यशस्वी असलेल्या या अभिनेत्याने एकेकाळी खूप स्ट्रगल केला आहे. आम्ही तुम्हाला अभिनेत्याची सक्सेस स्टोरी सांगणार आहोत. याबाबत बोलताना अभिनेत्याने स्ट्रगलिंग दिवसांना आठवत सांगितलं की, कमी बजेट मध्ये सगळं कसं मॅनेज करावं. 


वांद्रेमध्ये अभिनेत्याची रुम होती. या रुममध्ये शरद  ९ मुलांसोबत रुम शेअर करायचा. त्याचबरोबर त्याच्या घराच्या परिसरात एक राजस्थानी हॉटेलही होतं. त्याच ढाब्यातून तो जेवण मागवायाचा त्या हॉटेलमध्ये त्याला २ रुपयाला रोटी मिळायची. याचबरोबर तो अंडी आणायचा. या सगळ्याचा खर्च २५ रुपयांचा होता. त्याच्या जेवणाचा खर्च सकाळ संध्याकाळ २५ रुपये इतका होता. त्याने तिथे गॅस आणि सिलेंडरची व्यवस्था केली. त्यामुळे सगळा स्वयंपाक तो घरीच करायचा.


याचबरोबर शरदने सांगितलं की, अभिनेत्याने सुरुवातीला जीममध्ये जॉब केला होता. यावेळी त्याला महिना इतका 2750 पगार होता. एवढंच नव्हेतर एकदा त्याला रॅम्पवर ३ मिनटं रॅम्पवॉक करण्यासाठी 5000 रुपयांची ऑफर देण्यात आली. कुठलाही विचार न करता अभिनेत्याने ही ऑफर पटकन स्वीकारली. आणि अभिनेत्याच्या प्रवासाला खरी इथूनच सुरुवात झाली.
 
यासोबतच पुढे अभिनेा बोलताना म्हणाला, फोटोशूट किंवा जाहिरातीसारखं काही काम मिळालं की, आम्ही पार्टी करायचो नाहीतर परिस्थिती खूप खराब असायची आमची. त्याला खरी ओळख मिळाली ती म्हणजे सात फेरेमधूनच. त्याने या मालिकेत  नहार बन्ना ही व्यक्तिरेखा साकारली होती. या मालिकेमुळे तो घरा-घरा पोहोचला. आक्रोश या टीव्ही शोमधून त्याला पहिल्यांदा काम करण्याची संधी मिळाली. 


याचवर्षी त्याला भाभी आणि रात होने को है. हे शो करण्याची संधी मिळाली. यानंतर २००५मध्ये त्याने सिंदूर तेरे नाम का सात फेरे: सलोनी का सफरमध्ये काम केलं. यानंतर त्याची करिअरची गाडी सुसाट सुटली आणि यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही आणि यानंतर त्याच्या सक्सेस प्रवासाला सुरुवात झाली. यानंतर 2004 मध्ये तिने हलचल सिनेमात एक छोटीशी भूमिका साकारली. 2012 मध्ये त्याने १९२० सिनेमात काम केलं. या सिनेमातून त्याला मोठा ब्रेक मिळाला. यानंतर रामलीला सिनेमातही तो झळकला. यानंतर तान्हाजी सिनेमा छत्रपती शिवाजी महारांजी भूमिका साकारली. जी प्रेकक्षांनी डोक्यावर घेतली.