Bollywood Star`s : एकेकाळी बॉलिवूड गाजवलं, आज `या` स्टार्सवर आली इतकी वाईट वेळ
बॉलिवूडच्या `या` प्रसिद्ध स्टार्सवर आली वाईट वेळ, काहींना भीक मागावी लागली, तर काहींनी चोरी केली, कोण आहेत हे स्टार्स?
Bollywood Star's Life : बॉलिवूडमध्ये (Bollywood) स्वप्न साकार कण्यासाठी अनेक कलाकार वेगवेगळ्या राज्यांतून आणि देशातून येत असतात. काहीजणांना प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही मिळतो तर काहीजण मात्र अपयशी होतात. बॉलिवूडमध्ये चमकायचे असल्यास सगळा नशीबाचा खेळ आहे असं म्हटलं जाते. नशिबाबद्दल काही सांगता येत नाही. नशीब कधीही बदलू शकते. अनेक लोक रातोरात श्रीमंत झाले, तर अनेक श्रीमंत लोक रातोरात गरीब झाले. या पोस्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशाच काही बॉलिवूड स्टार्सबद्दल (stars) सांगणार आहोत जे एकेकाळी खूप लोकप्रिय होते. पण त्याच्या दुर्दैवाने सध्या त्यांना फारसे काम आणि लोकप्रियता मिळाली नाही. त्या यादित कोणत्या कलाकारांची नावे येतात हे सांगणार आहोत. (once upon a time this megastars bollywood was popular today such a bad time has come nz)
1. सुलक्षणा पंडित (Sulakshana Pandit)
संजीव कुमारसोबतच्या (Sanjeev Kumar) अफेअरमुळे (Affairs) प्रसिद्धीच्या झोतात आलेली पार्श्वगायिका सुलक्षणा पंडित एकदा मुंबईतील मंदिराबाहेर भीक मागताना दिसली होती. शेवटी तिच्या बहिणीने तिला खूप मदत केली आणि तिची काळजी घेतली.
2. सावी सिद्धू (Savi Sidhu)
काही काळापूर्वी अशी बातमी आली होती की, सुप्रसिद्ध अभिनेता सावी सिद्धू एका हाऊसिंग सोसायटीत वॉचमन (Wactchman) म्हणून काम करत आहे. याआधी तो गुलाल, पटियाला हाउस आणि बेवकूफियां सारख्या चित्रपटांमध्ये दिसला होता. पण तब्येत बिघडल्यामुळे त्यांना नाइलाजाने चित्रपटसृष्टी सोडावी लागली.
हे ही वाचा - अभिनेत्री अभिनयाव्यतिरिक्त 'या' मार्गाने कमवतात कोट्यवधी रुपये, वाचून बसेल आश्चर्याचा धक्का
3. गीतांजली नागपाल (Geetanjali Nagpal)
गीतांजली नागपाल एकेकाळी खूप प्रसिद्ध अभिनेत्री (Actress) आणि मॉडेल (Model) होती. पण तिच्या ड्रग्जच्या (Drugs) वाईट सवयींनी तिच्या करिअरचा नाश केला. पैसे मिळवण्यासाठी ती मोलकरीण म्हणूनही काम करायची. नंतर महिला आयोगाने तिला मदत करून तिच्यावर उपचार केले.
4. ओपी नय्यर (Omkar Prasad Nayyar)
बॉलीवूड चित्रपटांना अनेक हिट संगीत (Hit Songs) देणाऱ्या ओपी नय्यर यांनी दारूच्या वाईट सवयीमुळे त्यांचे संपूर्ण करिअर उद्ध्वस्त केले. जेव्हा कोणी त्याची मुलाखत घ्यायचे तेव्हा तो प्रत्येकाकडे दारूसाठी (Alcohol) पैसे मागायचे. 2007 मध्ये त्यांचे निधन झाले.
5. मिताली शर्मा (Mitali Sharma)
बॉलीवूडमध्ये करिअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगून मुंबईतील भाई मिताली शर्मा हिला ओशिवरा परिसरात कारच्या खिडकीच्या काचा फोडताना मुंबई पोलिसांनी पकडले. ती भीक मागायची आणि आयुष्य काढण्यासाठी चोरीही करायची. तिला मानसिक रुग्णालयात (Mental Hospital) दाखल करण्यात आले.
6. सीताराम पांचाळ (Sitaram Panchal)
सीताराम पांचाळ यांनी पीपली लाइव्ह आणि पान सिंग तोमर यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. तथापि, दुर्दैवाने त्यांचे आरोग्य बिघडले, त्यांना दीर्घकाळ मूत्रपिंड, फुफ्फुसाच्या समस्यांशी संघर्ष करावा लागला. 2017 मध्ये त्यांचे निधन झाले. तिच्या उपचारासाठी तिच्या चाहत्यांकडून आर्थिक मदत घेतली होती.