मुंबई : छोट्या पडद्यावरील आणि भोजपुरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आपल्या सौंदर्याने आणि आपल्या स्टाईलने लोकांना भुरळ घालणारी मोनालिसा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि चाहत्यांचं भरपूर मनोरंजनही करते. यावेळी मोनालिसाने तिच्या चाहत्यांसोबत इंस्टाग्रामवर आस्क मी एनिथींग हे सेशन ठेवलं होतं. ज्यावर अभिनेत्रीलाही अनेक विचित्र प्रश्नांना सामोरं जावं लागलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर, मोनालिसाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर 'आस्क मी एनिथींग' सत्र ठेवलं, ज्यामध्ये तिला तिच्या चाहत्यांनी आणि फॉलोअर्सने तिला अनेक विनंत्या केल्या आणि प्रश्न विचारलं. यादरम्यान अभिनेत्रीच्या एका चाहत्याने मागणी केली. एका यूजरने मोनालिसाचा फोन नंबर मागितला. मोनालिसाच्या या पोस्टवर चाहत्याने लिहिलं, 'तुझा फोन नंबर माझ्यासोबत शेअर करशील का?' यावर, अभिनेत्रीने मजेदार पद्धतीने 1 ते 21 अंकांची रँडम संख्या शेअर केली.


इतकंच नाही तर एका यूजरनं मोनालिसाला विचारलं, 'सकाळी-सकाळी सगळ्यात आधी काय करतेस?’ यावर अभिनेत्रीने रिप्लाय देत लिहिले- 'प्रार्थना'. जेव्हा एका चाहत्याने मोनालिसाला तिचा बेडरुम फोटो शेअर करायला सांगितला यावर अभिनेत्रीनेदेखील फार हुशारीने तिच्या आलिशान बेडरुमची झलकही शेअर केली.



 


मोनालिसाच्या या स्टाईलवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. तिच्या प्रत्येक पोस्टवर तिचे चाहते भरभरून प्रतिक्रिया देतात. 2008 मध्ये मोनालिसाने भोले शंकर नावाच्या चित्रपटातून भोजपुरी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. मोनालिसा बॉलिवूडमध्येही दिसली आहे. तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट 'ब्लॅकमेल' होता. ज्यामध्ये ती अजय देवगण आणि सुनील शेट्टीसोबत दिसली होती.