मलायकाची एक इच्छा कायम राहिली अपूरी, म्हणाली...
मलायका अरोरा कायम तिच्या आणि अभिनेता अर्जुन कपूरच्या नात्यामुळे चर्चेत असते.
मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा कायम तिच्या आणि अभिनेता अर्जुन कपूरच्या नात्यामुळे चर्चेत असते. मलायका आज जरी अरबाज खानपासून दूर असली तरी दोघेही त्यांच्या मुलाचा म्हणजे अरहानकडे दुर्लक्ष करत नाहीत. अरहान आता 18 वर्षांचा आहे. जीवनात प्रत्येकाची कोणतीतरी एक इच्छा असते, ती कधीचं पूर्ण होत नाही. अशीचं एक इच्छा आहे मलायकाची. मलायकाबद्दल सांगायचं झालं तर ती लवकरचं 'सुपर डान्सर चॅप्टर 4' मध्ये दिसणार आहे.
'सुपर डान्सर चॅप्टर 4' या शोमध्ये परीक्षकाची भूमिका अभिनेत्री शिल्पा शेट्टीकडे होती. पण आता शिल्पाच्या जागी अभिनेत्री मलायका अरोराची वर्णी लागली आहे. शिल्पाच्या जागी या आठवड्यात मलायका परीक्षक म्हणून भूमिका बजावणार आहे. दरम्यान शोमध्ये स्पर्धांनी एकापेक्षा एक डान्स सादर करून सर्वांचं मन जिंकलं.
पण अवघ्या 6 वर्षाच्या फ्लोरिना गोगोईने तिच्या नृत्य कौशल्याने मलायकाला घायाळ केलं. नृत्य सादरीकरणानंतर मलायकाने फ्लोरिनाला जवळ घेतलं आणि तिचं मनभरून कौतुक केलं. याठिकाणी मलायकाने तिची इच्छा देखील व्यक्त केली. मलायकाने मला कायम एक मुलगी हवी होती , अशी इच्छा व्यक्त केली.
मलायका म्हणाली, 'मी तुला घरी घेवून जाऊ? माझ्या घरी एक मुलगा आहे. फार पुर्वी मी म्हणायची मला एक मुलगी असती तर? माझ्याकडे सुंदर कपडे आणि चपला देखील आहेत. पण त्या घालायला कोणी नाही.' त्यानंतर मलायकाने फ्लोरिनाला घट्ट मिठी मारली.