मुंबई : हॉलिवूड चित्रपट 'एव्हेन्जर एन्डगेम'ने भारतात तुफान कमाई केली आहे. या चित्रपटासाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात टिकीट बुक केलं होतं. अजूनही चित्रपटाच्या तिकिटाची ऑनलाईन विक्री हाऊसफुल आहे. भारताच्या बॉक्स ऑफिसवर 'एव्हेन्जर एन्डगेम'ने जबरदस्त कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शनापूर्वीच एन्डगेम'ने कोटींचा गल्ला जमवला होता. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जवळपास ६३.२१ कोटी रुपयांची कमाई केली होती. 'एव्हेन्जर एन्डगेम'ने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


'एव्हेन्जर एन्डगेम' प्रदर्शित झाल्यापासून भारतात पहिल्या आठवड्यात २६० कोटींचा आकडा पार केला आहे. प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाच्या कमाईत कोणतीही कमी आलेली नाही. चित्रपट समिक्षक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, २६०.४० कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'एव्हेन्जर एन्डगेम'ने 'बाहुबली २'चा रेकॉर्ड तोडला आहे. 'बाहुबली २'ने एका आठवड्यात जवळपास २४७ कोटी रुपयांची कमाई केली होती. 



बॉक्स ऑफिसवर 'एव्हेन्जर एन्डगेम'चा असाच परिणाम सुरु राहिला तर दुसऱ्या बॉलिवूड चित्रपटांना मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. येत्या १० तारखेला 'स्टुडंट ऑफ द ईयर २' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. परंतु 'एव्हेन्जर एन्डगेम'ची कमाई अशीच चालू राहिल्यास इतर चित्रपटांवर परिणाम होण्याची, चित्रपटांना मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.