मुंबई :  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे. काही बालकांनी तर त्यांच्या आई-वडिलांना गमावलं आहे. काही दिवसांपूर्वी एका महिलेचा कोरोनानं मृत्यू झाला आणि त्यांच 2 महिन्याचं तान्ह बाळ कायमचं पोरकं झालं. त्या 2 महिन्याच्या बाळाला सध्या आईच्या दूधाची अत्यंत गरज आहे. या तान्ह्या बाळाच्या मदतीसाठी अभिनेत्री भूमी पेडणेकर धावून आली आहे. भूमी पेडणेकरने बाळाच्या मदतीसाठी ट्विट केलं आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भूमी ट्विट करत म्हणाली, 'काही दिवसांपूर्वी एका महिलेचा कोरोना विषाणूमुळं निधन झालं. त्या महिलेचं बाळ फक्त दोन महिन्यांचं आहे. बाळाला आईच्या दूधाची फार गरज आहे. पश्चिम बंगालमध्ये ज्या महिला स्तनपान करतात, आणि ज्या आपलं दुध ‘फ्रीज’ करू शकतात अशा महिलांनी पुढाकार घ्यावा' 


शिवाय कोलकाता, बांकुरा, दुर्गापूर आणि बिनशपूर मधून आठवड्यातून एक वेळा दुध जमा करू शकता अशा महिलांनी रविना पटेल यांना मेसेज करावा. असं देखील भूमीने ट्विटमध्ये म्हटलं आहे. भूमी पेडणेकरचं हे ट्विटसध्या तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान कोरोना काळात भूमी अनेक लोकांची मदत करत आहे.