मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेने छोट्यांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाला पोट धरून हसण्यास भाग पाडलं आहे. मालिकेला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. चाहत्यांचं मालिकेतेतील प्रत्येक कलाकरासोबत घट्ट नातं तयार झालं आहे. या मालिकेत 'पत्रकार पोपटलाल' ही एक खास व्यक्तिरेखा आहे जी अद्यापही लग्नाच्या प्रतीक्षेत आहे. लग्नासाठी शंभर प्रयत्न करणारा पोपटलाल आता आपली पत्रकारिताही सोडण्याच्या तयारीत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता पोपटलाल करिअर बदलून भाजी विकणार आहे. 'तारक मेहता उल्टा चष्मा' या मालिकेतील पोपटलालच्या लग्नाने आतापर्यंत अनेकवेळा लोकांच्या हशा पिकला आहे. पण यावेळी काय होणार आहे, याची कल्पनाही कोणी केली नसेल. कारण आता पोपटलालने पत्रकारिता सोडून भाजी विकण्याचा निर्णय घेतला आहे.



गोकुळ धाम सोसायटीतील कोमल, बबिताजी आणि माधवी यांच्यासोबत पोपटलाल आता भाजीचा व्यवसाय करण्याची योजना आखत आहेत. पोपटलालच्या भाजीपाला विकण्याच्या कल्पनेमागचा हेतू कमाई हा नसून या कामातून त्याला आपली वधू शोधता येईल अशी आहे. कारण जेव्हा तो भाजी विकण्यासाठी दारोदारी जाईल तेव्हा एखाद्या मुलीसोबत प्रेम संबंध जुळून येतील आणि लग्न होईल, अशा उद्देशाने पोपटलालने भाजी विकण्याचा निर्णय घेतला आहे.