विराटच्या निवृत्तीनंतर पहिल्याच T20 सामन्यात हार्दिकने मोडला त्याचा रेकॉर्ड; धोनीलाही जमलं नाही ते...

Hardik Pandya Smashes Virat Kohli All Time T20I Record: विराट कोहली टी-20 क्रिकेटमधून जून महिन्यात भारताने टी-20 चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर निवृत्त झाला. या सामन्यानंतर हार्दिक पहिल्यांदाच भारताकडून टी-20 खेळण्यासाठी मैदानात उतरला आणि त्याने विराटचा एक अनोखा विक्रम मोडीत काढला. हा विक्रम कोणता ते पाहूयात...  

| Oct 07, 2024, 12:53 PM IST
1/10

hardikvsban

विराटच्या निवृत्तीनंतरच्या आपल्या पहिल्याच सामन्यात हार्दिकने त्याचा एक अनोखा विक्रम स्वत:च्या नावावर करुन घेतला. याचसंदर्भात जाणून घेऊयात...

2/10

hardikvsban

भारत आणि बांगलादेशदरम्यान झालेला टी-20 मालिकेतील पहिला सामना भारताने सहज जिंकला. या विजयामध्ये भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने गोलंदाजी आणि फलंदाजीमध्येही चमक दाखवली.

3/10

hardikvsban

विशेष म्हणजे विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर पहिल्यांदाच टी-20 सामना खेळणाऱ्या हार्दिकने विराटचा एक अनोखा विक्रम मोडला. पूर्वी विराटच्या नावावर असलेला एक अनोखा विक्रम स्वत:च्या नावावर करुन घेताना पांड्याने नेमकं काय केलंय पाहूयात...

4/10

hardikvsban

ग्लाव्हेरच्या मैदानामध्ये 14 वर्षानंतर झालेल्या टी-20 सामन्यामध्ये भारताने प्रथम गोलंदाजी केली. गोलंदाजी करताना हार्दिकने आपल्या चार ओव्हरमध्ये 26 धावांच्या मोबदल्यात 1 विकेट घेतली. त्याने 6.50 च्या इकनॉमी रेटने गोलंदाजी केली. 

5/10

hardikvsban

त्यानंतर 128 धावांचा पाठलाग करताना हार्दिकने 16 बॉलमध्ये 39 धावा केल्या. यामध्ये त्याने पाच चौकार आणि दोन षटकार लगावले. त्याने 243.75 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या.  

6/10

hardikvsban

या खेळीदरम्यान हार्दिकने सुंदर फटकेबाजी केली. विशेष म्हणजे त्याने तस्कीन अहमदला एक भन्नाट नो-लूक शॉट लगावला. भारताला विजयासाठी अवघ्या 12 धावांची आवश्यकता असताना तस्कीन 12 वी ओव्हर टाकायला आला. तस्कीनने ओव्हरमधील तिसरा चेंडू हा अखूड टप्प्याचा म्हणजेच शॉर्ट बॉल टाकला. हा चेंडू हार्दिकच्या अंगावर येईल अशा पद्धतीने तस्कीनने स्वींग केला होता. मात्र पंड्याने तो तितक्याच किंबहुना अधिक भन्नाट पद्धतीने खेळून काढला.  

7/10

hardikvsban

हार्दिकने अंगावर येणाऱ्या या शॉर्ट पीच बॉलला केवळ बॅट लावत तो विकेटकीपरच्या डोक्यावरुन मागील बाजूस टोलावला. हा फटका खेळताना हार्दिकचा आत्मविश्वास इतका होता की बॅटचा बॉल लागल्यानंतर बॉल कोणत्या दिशेने गेलाय हे पाहण्याचं कष्टही हार्दिकने घेतलं नाही. पांड्याने फटका मारल्यानंतर चेंडू कुठे गेला हे पाहण्याऐवजी तस्कीनला अगदी डेथ स्टेअर म्हणतात तसा खाऊ की गिळू असा लूक दिला. हार्दिकने मारलेला फटका पाहून तस्कीनला विश्वास बसत नव्हता की एवढ्या चांगल्या चेंडूवर हा फटका लगावण्यात आला आहे. 

8/10

hardikvsban

हार्दिकने लगावलेल्या या शॉटने भारत जिंकला. पांड्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे भारताचा विजय सुखकर झाला आणि भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली. भारताने 49 बॉल शिल्लक असतानाच सामना जिंकला हे ही विशेष आहे. 

9/10

hardikvsban

षटकार खेचत हार्दिकने विजय मिळून देताच त्याने अनोखा विक्रम आपल्या नावावर केला. भारताचा हा विजय हार्दिकने टी-20 सामन्यात पाचव्यांदा षटकाराच्या मारत भारताला मिळवून दिलेला विजय ठरला. पाच वेळा षटकार मारुन भारतीय संघाला टी-20 सामना जिंकून देणारा हार्दिक हा पहिलाच खेळाडू ठरला आहे.   

10/10

hardikvsban

यापूर्वी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. विराटने भारताला 4 वेळा षटकार मारुन सामने जिंकून दिले आहेत. टी-20 वर्ल्ड कपमधील विजयानंतर विराट कोहलीने अंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्याने हा विक्रम आता हार्दिकच्या नावावरच राहणार आहे.