COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : बॉलीवुडचा बादशाह शाहरूख खानच्या वाढदिवसालाच त्याच्या आगामी सिनेमा 'झिरो'चा ट्रेलर रिलीज करण्यात आलायं. शाहरूखने तसंतर आपल्या फॅन्सना काही दिवसांपूर्वीच याबद्दल माहिती दिली होती. आज जन्मदिवशी 'झिरो' चा ट्रेलर लॉंच झालायं. रोमांसचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा शाहरूख या सिनेमात लहान उंची असलेल्या इसमाच्या कॅरेक्टरमध्ये पाहायला मिळणार आहे. या सिनेमात शाहरूखसोबत पुन्हा एकदा कॅटरिना आणि अनुष्का दिसणार आहेत. याआधी ही जोडी 'जब तक है जां' सिनेमात दिसली होती. सिनेमाचा ट्रेलर दमदार आहेच पण यातील पाच महत्त्वाचे डायलॉग्ज आतापासूनच प्रेक्षकांच्या तोंडात रुळले आहेत. 


1) 38 की उम्र में जो लोग कुंवारे घूमते हैं... उन्हें बारिश से डर नहीं लगता.


2) तुम्हें कैसे लगा कि तुम मुझसे शादी कर सकते हो? शादी किसे करनी थी... हमारे यहां प्लॉट देखने के पैसे थोड़ी न लगते हैं. 


3) एक वही तो थी जिसकी आंखों में आंखे डालकर मैं बात बोल सकता था... वो मेरे बराबर थी, मैं उसके बराबर...


4) अगर उसके साथ होता न तो जिंदगी बराबरी की कटती, पर जिंदगी काटनी किसे थी.. हमें तो जीनी थी.


5) हम किसी के बराबर हो सकें... ये सपना भगवान ने हमारा छीन लिया था... बदले में, हमने भगवान से भी पूरे हिंदुस्तान का सपना छीन लिया. 


झीरोच्या ट्रेलरमध्ये सुरूवातील बबुआच्या कॅरेक्टरमध्ये दिसणारा शाहरूख स्वत:साठी मुलगी शोधताना दिसतोय.


लहान उंचीचा बबुवा ज्या मुलीला म्हणजेच अनुष्काला भेटायला जातो ती व्हिलचेयरवर असते. तरीही त्याला तिच्याशी प्रेम होतं. यावेळी बबुआ 'जिंदगी काटनी किसे थी.. हमें तो जीनी थी' असा डायलॉग बोलताना दिसतो. यावेळी कॅटरिनाची एन्ट्री होते.