मुंबई : महाराष्ट्रातील बालरंगभूमी चळवळीचा आढावा घेतला असता बालरंगभूमी अधिक भक्कम आणि परिपूर्ण होण्यासाठी बालरंगभूमी संघटनेची  निवड  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्हाला प्रकर्षाने जाणवली. यासाठी  आम्ही महाराष्ट्रातील या क्षेत्रात कार्यरत असलेल्या २५ रंगकर्मींना एकत्र घेऊन अनुभवी ज्येष्ठ रंगकर्मींचा सल्ल्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनात "बालरंगभूमी अभियान" या संघटनेची दि. ५ जुलै २०१७ रोजी स्थापना केली आणि याची धर्मादाय आयुक्त कार्यालयात रीतसर नोंदणी केली.


नुकतेच "बालरंगभूमी अभियान" संघटनेचा रीतसर उदघाटन सोहळा नुकताच मुंबई येथे दिमाखात संपन्न झाला. याप्रसंगी मा.सौ.वर्षाताई विनोद तावडे तसेच ज्येष्ठ रंगकर्मी  मा.श्री. विजय केंकरे, बालरंगभूमी अभियानाच्या  अध्यक्षा मा. कांचनताई सोनटक्के आणि नाट्यक्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.


बालरंगभूमी विषयक विविध उपक्रमांची संख्या, व्याप्ती व दर्जा उंचावून बालरंगभूमी सकस व समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे.शालेय शिक्षकांना नाट्यप्रशिक्षण देणे.बालनाट्य किशोरनाट्य कुणारनाट्य सादरीकरणासाठी येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासन, महानगरपालिका, जिल्हा समिती स्तरावर प्रयत्न करणे. बालनाट्याच्या प्रयोगांना महाराष्ट्र शासनाचे अनुदान मिळविण्यासाठी प्रयत्न करणे.शासनाच्या सह्याद्री आणि इतर खाजगी वाहिन्यांवर बालनाट्यासाठी वेळ राखून ठेवण्यासाठी तसेच रंगभुनीच्या इतर पुरस्कारांबरोबर बालनाट्याला पुरस्कार ठेवण्यासाठी व मिळविण्यासाठी प्रयत्न करणे.बालदिनानिमित्त नाट्य परिषदेच्या प्रत्येक शाखेच्या ठिकाणी प्रतिवर्षी एक बालनाट्य महोत्सव आयोजित करण्यासाठी पाठपुरावा करणे. बालनाट्याचे प्रयोग, बालनाट्य महोत्सव आणि बालरंगभूमी संदर्भात विविध विषयांवर उपक्रम चर्चासत्रे इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे. दर्जेदार बालनाट्य संहिता संग्रहित करणे.बालनाट्य मार्गदर्शनपर  पुस्तिका छापून शासनाच्या मदतीने त्या शालेय शिक्षकांपर्यंत पोहचविणे ही बालरंगभूमी अभियानाची उद्दिष्टे आहेत. 


अहमदनगर, शिरूर, सोलापूर, बार्शी आदी ठिकाणी डिसेंबर २०१७ ते जानेवारी २०१८ याकालावधीत येथे बालनाट्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या याला उत्तम प्रतिसाद मिळाला.