निर्मात्यांनी हुशारीनं लपवले Oppenheimer चित्रपटातील नग्न तसेच प्रणयदृश्यं, सेन्सॉरनं दिलं `हे` प्रमाणप्रत्र
Oppenheimer Censor Certificate: `ओपेनहायमर` या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटाला सेन्सॉरनं U/A प्रमाणपत्र दिलं आहे. त्यातून या चित्रपटातील सेक्स आणि नग्न दृश्य ही निर्मात्यांकडूनच लपवण्यात आली आहेत.
Oppenheimer Censor Certificate: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे 'ओपेनहायमर' (Oppenheimer Sex Sequence) या हॉलिवूड चित्रपटाची. आज हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला असून भारतातही या चित्रपटाचे शोज लागले आहेत. या चित्रपटाची तरूणाईमध्ये तूफान क्रेझ आहे. या चित्रपटाच्या तिकीटांची सर्वत्र चांगली कमाई झाली असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करेल अशी खात्री वाटते आहे. या चित्रपटाचे तिकीटही महाग आहे. यावेळी या चित्रपटाची जशी चर्चा सुरू असताना आता या चित्रपटातील एका दृश्याचीही जोरात चर्चा रंगली आहे. अभिनेता सिलियन मर्फी आणि फ्लॉरेन्स पग यांच्यात एक सेक्स सीन आहे. थोडक्यात हा सीन थोडासा ब्लर करण्यात आला आहे, अशी बातमी कळते आहेत. हा चित्रपट 21 जूलै रोजी प्रदर्शित झाला असून J. Robert Oppenheimer या शास्त्राज्ञांच्या जीवनावर आधारित आहे. अणुबॉम्ब बनवण्यासाठी यांचे योगदान खूप मोठे आहे.
या चित्रपटातून सिलियन मर्फी हा त्यांची भुमिका करतो आहे. सिलियन मर्फी यांच्यासमवेत एमिली ब्लंट, मॅट डॅमन, रॉबर्ट डाऊनी ज्युनियर आणि फ्लॉरेन्स पग यांच्याही तितक्याच प्रमुख भुमिका आहेत. या चित्रपटाच्या सुरूवातीच्या सीनमध्ये सिलियन मर्फी आणि फ्लॉरेन्स पग यांच्यात सेक्स सीन आहे. सुरूवातीला ते एकमेकांच्या जवळ जातात आणि मग बिछान्यात जवळ येतात. तेवढ्यात त्यांचे नग्न चित्रिकरणही यात दाखवण्यात आले आहे. त्यामुळे हा सीन मागून ब्लर करण्यात आले आहे. त्यांच्या शरीराचा कोणताही भाग या सीनमध्ये सदृश्य नाही. तेव्हा यामुळे हा चित्रपट सध्या चर्चा आला आहे. हा सीन तसाच ठेवेत त्यांनी या चित्रपटातील या सीनचा बंदोबस्त केला आहे. यावेळी ते तो दोघं Bhagvat Gita वाचताना दाखवले आहेत हा सीन चित्रपटात आहे तसाच आहे.
हेही वाचा - रॅम्प वॉक करताच थांबला रणवीर, दीपिका Kiss केलं अन्... कोण म्हणतं त्यांच्यात दुरावा?
'बॉलिवूड हंगामा'च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाला 19 जूलै रोजी माध्यमांसाठी स्क्रिनिंग दाखवण्यापुर्वी सेन्सॉर प्रमाणपत्र देण्यात आले आहे. हे स्क्रिनिंग मुंबईत पार पडले. हा चित्रपट 3 तासांचा आहे. या रिपोर्टमध्ये हेही म्हटलं आहे की, सेन्सॉर बोर्ड त्यांना हा सीन कट करायला लावले अथवा ''A'' प्रमाणात देईल. त्यामुळे या चित्रपटांच्या निर्मात्यांनीच या सीन्सचा आपणहून हुशारीनं बंदोबस्त लावला आहे. त्यामुळे हा सीन कट झालेला नसून तो या चित्रपटात आहेत तसाच आहे.
सेन्सॉरनं ‘a*****e’ हा आक्षेपार्ह शब्द म्यूट करायला सांगितला आहे. सोबतच सबटाईटल्समधूनही काढायला सांगितला आहे. सध्या हा चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.