मुंबई: बॉलिवूडची हरहुन्नरी अभिनेत्री श्रीदेवी २४ फेब्रुवारी २०१८ रोजी काळाच्या पडद्या आड गेली. त्यांना देवयाज्ञा प्राप्त होवून एक वर्ष पूर्ण होणार आहे. त्यासाठी कपूर कुटुंबीयांनी एका पूजेचे आयोजन केले आहे. सर्व कपूर कुटुंब पुण्यतिथीच्या तयारीमध्ये व्यग्र आहेत. त्यांच्या आत्म्यास लाभण्यासाठी पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. पूजेचे आयोजन फार मोठ्या प्रमाणावर करण्याचे योजीले असून अनेक दिग्गज मंडळी पूजेसाठी उपस्थित राहणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पूजेची संपूर्ण जबाबदारी पती बोनी कपूर आणि  मुलगी जान्हवी कपूरने हाती घेतली आहे. त्यांच्या मदतीसाठी अभिनेता अर्जून कपूर सुद्धा उपस्थित राहणार आहे. पूजेचे आयोजन श्रीदेवी यांच्या चेन्नईतील निवास स्थानी करण्याचे योजीले आहे. पूजेमध्ये संपूर्ण कपूर कुटुंब त्याचप्रमाणे नातेवाईक हजेरी लावणार आहेत. श्रीदेवी यांच्या साउथ इंडस्ट्री सहकलाकार सुद्धा उपस्थित राहणार आहेत.   


मागिल वर्षी २४ फेब्रुवारी रोजी दुबईतील एका आलीशान हॉटेलमध्ये श्रादेवी मृत अवस्थेत अढळल्या होत्या.  आपल्या नातेवाईकाच्या लग्न समारंभासाठी त्या दुबईत गेल्या होत्या.  श्रीदेवींनी पती बोनी कपूर यांना काही काळ दुबईत थांबण्यासाठी आग्रह केला होता पण बोनी कपूर कामा निमीत्त मुंबईत आले. त्यानंतर हॉटेलच्या बाथटबमध्ये श्रीदेवींचा दुर्दैवी अंत झाला. त्यांच्या निधनाची बातमी कळताच बॉलिवूड त्याचप्रमाणे देशभरात एकच खळबळ माजली. श्रीदेवींची शेवटची झलक शाहरुख खानच्या झिरो सिनेमात पाहुणे कलाकार म्हणून अनुभवास मिळाली.