Orry's entry in bigg boss 17 : छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस 17' या रिअॅलिटी शोची चांगलीच लोकप्रियता आहे. बिग बॉसच्या घरात असलेले स्पर्धक हे काही ना काही करताना दिसतात. या सगळ्यात शोमध्ये काही नवी लोकांची एन्ट्री झाली आहे. यावेळी बिग बॉसमध्ये ड्रामा आणि ट्विस्ट खूप पाहायला मिळणार आहेत. त्यात एका नव्या एपिसोडमध्ये आता खूप मोठा धमाका पाहायला मिळाला आहे. यावेळी वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली असून तो ऑरी आहे. ओरहान अवतरमणि उर्फ ओरीची बिग बॉसमध्ये एन्ट्री झाली आहे. त्यामुळे आता तो कसा गेम खेळणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड सेलिब्रिटींमुळे सतत चर्चेत असणाऱ्या ऑरीनं सलमान खानच्या शोमध्ये भाग घेतला आहे. या दरम्यान, स्टेजवर येताना ऑरी खूप सामान घेऊन पोहोचला होता. सलमान खान वाइल्ड कार्ड कंटेस्टंट ऑरीचं स्वागत केलं आहे. त्यावेळी सलमान खान म्हणाला की आम्ही या शोमध्ये सगळ्यांचा सन्मानानं शोमध्ये पाठवतो पण आम्ही तुला इतक्या सामानासोबत पाठवू. सलमान पुढे बोलतो की सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे की तू नक्की काय काम करतोस? यावर ऑरीनं हसतो.



सलमान खान बोलतो की लोकांना हे देखील जाणून घ्यायचे आहे की ऑरीलो बी टाऊन पार्ट्यांमध्ये जाण्यासाठी पैसे दिले जातात का? हे ऐकल्यानंतर ऑरी म्हणतो, 'मला पैसे मिळत नाहीत पण माझ्या मॅनेजरला सांगून लोक मला फोन करतात. ऑरीचे उत्तर ऐकून सलमान खान चकित होतो आणि म्हणतो, 'मॅनेजर?' यावर ओरी म्हणतात, 'होय, माझ्याकडे एकूण 5 व्यवस्थापक आहेत जे माझ्या व्यावसायिक आणि वैयक्तिक गोष्टींचे व्यवस्थापन करतात.'


हेही वाचा : सलमानच्या 'फाटक्या', 'कुजलेल्या' बुटांची किंमत 2nd Hand कारहूनही अधिक


दरम्यान, ऑरी खूप लग्झरीयस आयुष्य जगतो. 'बिग बॉस 17' मध्ये राहण्यासाठी त्यानं खूप सामान आणला आहे. ऑरीचं आलिशान जीवनशैली पाहून सलमान देखील आश्चर्यचकित झाला आहे. 10 लाख रुपयांचे घड्याळ आणि 1.5 लाख रुपये किमतीचे शूज घालून शोच्या वाईल्ड कार्ड एन्ट्री एपिसोडला सलमान खान आल्याचे समजल्यावर सलमानला स्वतःचीच लाज वाटू लागली. या सर्व गोष्टी ऑरीनं स्वत: व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत.