Chat Leak : ऑरी आणि पलक तिवारीचे जोरदार भांडण, माफी मागूनही दाखवला मिडल फिंगर!
Orry-Palak Tiwari chat leak : ऑरी आणि पलक तिवारीचे चॅट्स व्हायरल... तर ऑरीच्या त्या लाजिरवाण्या कृत्यामुळे सोशल मीडियावर एकच चर्चा.
Orry-Palak Tiwari chat leak : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत राहते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. न्यू इयर पार्टीतील तिचे आणि इब्राहिम अली खानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले होते. तर आता तिचं चर्चेत येण्याचं कारण वेगळं आहे. पलक आणि ऑरीचं व्हॉटसअॅप चॅट सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. त्याचा स्क्रीनशॉट व्हायरल होतोय. व्हायरल होत असलेल्या स्क्रिनशॉटमध्ये पलक ऑरीची माफी मागताना दिसत आहे. तर दुसरीकडे ऑरीनं तिला मिडल फिंगर इमोटीकॉन पाठवलं आहे. इतकंच नाही तर त्यात पलकनं साराचा देखील उल्लेख केला आहे.
रेडिटवर सध्या एक स्क्रीनशॉट व्हायरल होतोय. त्या स्क्रीनशॉटमध्ये ऑरीचा फोन असल्याचे दिसत आहे. कारण त्या फोनवर तो ज्या व्यक्तीशी बोलोतोय त्या व्यक्तीचं नाव पलक तिवारी असल्याचे दिसत आहे. यात पलक समोरून ऑरीला मेसेज करताना दिसते की 'ऑरी, पलक बोलतेय. जर तुला माझ्याकडून क्षमेची आशा असेल.' तितक्यात ऑरीनं तिला मिडल फिंगरचं इमोटीकॉन पाठवलं. पुढे पलक बोलते की 'फक्त सारासाठी, मी हे करते. मला माफ कर.' तर पुढे ऑरी बोलतो की 'नाही, बेब. एकतर तू स्वत: साठी माफी माग कारण कोणाशी कसं बोलायचं हे तुला येत नाही.' तर पुढे पलक बोलते 'मी माफी आधीच मागितली आहे.'
Orry Palak Lafda?
byu/stick_by_me inBollyBlindsNGossip
हेही वाचा : 'त्याचा फोटो पाहून माझे हात-पाय गार पडले'; सुशांतचा अखेरचा फोटो पाहून अंकिता कोलमडली
दरम्यान, पलक आणि ऑरीमध्ये झालेल्या भांडणाचं कारण काय ते अजून समोर आलेलं नाही. पण नेटकऱ्यांना वाटतंय की त्या चॅटमध्ये पलकनं साराचा उल्लेख केला आहे. याचा अर्थ त्यांच्यात झालेल्या भांडणाचं कारण सारा अली खान असून शकते. दुसरीकडे सोशल मीडियावर त्यांच्यात झालेल्या या भांडणावर तर्क शोधत आहेत. त्या व्हिडीओला पाहून काही नेटकऱ्यांना असं वाटतंय की पलक आणि ऑरीमध्ये कोणत्या गोष्टीवरून भांडण झालं. तर ऑरीनं साराला सांगितलं की पलकला माफी मागण्यास सांगितलं. सारा त्या दोघांमध्ये मध्यस्ती आहे असे वाटते. त्यामुळेच पलकनं फक्त सारासाठी माफी मागितली आहे. तर काही नेटकऱ्यांनी ही पीआर अॅक्टिव्हिटी असल्याचे म्हटले आहे.