OSCAR 2018: प्री-ऑस्कर पार्टीत ऋचा चढ्ढा आणि अली फजल
हॉलिवूडचा सर्वात मोठा अवॉर्ड शो म्हणजे ऑस्कर पुरस्कार सोहळा. बॉलिवूड अभिनेता अली फजल आणि अभिनेत्री ऋचा चढ्ढा हे प्री-ऑस्कर डब्ल्यूएमई पार्टीत सहभागी झाले.
नवी दिल्ली : हॉलिवूडचा सर्वात मोठा अवॉर्ड शो म्हणजे ऑस्कर पुरस्कार सोहळा. बॉलिवूड अभिनेता अली फजल आणि अभिनेत्री ऋचा चढ्ढा हे प्री-ऑस्कर डब्ल्यूएमई पार्टीत सहभागी झाले.
अली फजलने रविवारी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ऋचा चढ्ढासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये "मी शपथ घेतो की, या फोटोची योजना नव्हती... हाहा! मात्र, जॅक उर्फ लियो या सेल्फीत दिसला. शनिवारी रात्री डब्ल्यूएमई पार्टीमध्ये अनेक दिग्गजांसोबत उपस्थित असणं ही एक सन्मानाची गोष्ट आहे" असं म्हटलं आहे.
ऑस्करच्या शर्यतीत सिनेमा
'विक्टोरिया अँड अब्दुल' हा सिनेमा (बेस्ट कॉस्ट्यूम डिझाईन आणि मेकअप - हेअरस्टायलिंग) या दोन कॅटेगरीत ऑस्करच्या शर्यतीत आहे. या सिनेमाची स्टोरी राणी विक्टोरिया आणि अब्दुल यांच्या नात्यावर आधारित आहे.
लॉस अँजेलिसमध्ये होत आहे कार्यक्रम
९० व्या अॅकेडमी अवॉर्डचं कार्यक्रम अमेरिकेतील लॉज अँजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या पुरस्कार सोहळ्यात जगभरातील दिग्दर्शक आपल्या सर्वोत्कृष्ट सिनेमातील कलाकारांसोबत उपस्थित आहेत. या पुरस्कार सोहळ्याचं प्रक्षेपण अमेरिकन टीव्ही चॅनल ABC वर रात्री ८ वाजल्यापासून होणार आहे. तर भारतात याचं प्रक्षेपण सोमवारी पहाटे ५.३० मिनिटांनी सुरु होणार आहे.