Oscar Awards 2024 Oppenheimer : ऑस्कर 2024 पुरस्कार सोहळ्याकडे सगळ्यांचे लक्ष होते. त्यात कोणत्या कलाकारांना पुरस्कार मिळणार हे जाणून घेण्याची सगळ्यांना फार उत्सुकता होती. अखेर हा पुरस्कार सोहळा पार पडला असून विजेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या सगळ्यात 'ओपनहायमर' या चित्रपटानं सगळ्यात जास्त पुरस्कार पटाकवले आहेत. किलियन मर्फीच्या 'ओपनहायमर'नं फक्त उत्त्कृष्ट अभिनेता नाही तर तब्बल 7 विभागात पुरस्कार पटकावले आहेत. यंदाचं ऑस्कर पुरस्काराचं वर्ष हे 'ओपनहायमर' च्या नावी झाल्याचं म्हणता येईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार किलियन मर्फीला मिळाला होता. या चित्रपटात त्यानं दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेच्या अणुबॉम्बच्या विकासाचे नेतृत्व करणाऱ्या भौतिकशास्त्रज्ञ 'ओपेनहायमर'ची भूमिका त्यानं  साकारली. किलियनचा हा पहिलाच अकादमी पुरस्कार आहे. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे जगभरात कौतुक झाले.



रॉबर्ट डाउनी ज्युनियरला त्याचा पहिला ऑस्कर पुरस्कार मिळाला असून तो 'ओपनहायमर'मध्ये साकारलेल्या सहाय्यक भूमिकेसाठी आहे. या आधी रॉबर्ट डाउनी ज्युनियरला तीन वेळा नामांकन मिळालं होतं. तर अखेर त्याला आता त्याचा हा पुरस्कार मिळाला आहे. 



सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोअर स्कोरसाठी 'ओपनहायमर'ला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.



सर्वोत्कृष्ट फिल्म ए़डिटिंगसाठी असलेला पुरस्कारही 'ओपनहायमर'साठी जेनिफिर लेनला मिळाला आहे. 



सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी 'ओपनहायमर'साठी Hoyte Van Hoytema ला मिळाला आहे.



क्रिस्टोफर नोलनला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. 



तर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार 'ओपनहायमर'ला मिळाला



दरम्यान, हा चित्रपट तुम्ही ओटीटीवर लवकरच पाहू शकता. हा चित्रपट 21 मार्च रोजी OTT प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर मोफत स्ट्रीम होणार आहे.