Oscars 2022 : पत्नीविषयी अभद्र बोलताच होस्टला दिवसा तारे दाखवणारा Will Smith आहे तरी कोण?
विलनं व्यासपीठावर येत विनोदवीर क्रिस रॉक याच्या कानशिलात लगावली.
मुंबई : हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ यानं पहिल्यांदाच ऑस्करवर आपलं नाव कोरलं आहे. पण, त्याला मिळालेल्या ऑस्कर पुरस्कारापेक्षा जास्त चर्चा ही त्यानं ऑस्कर सोहळ्याच्या होस्टला दाखवलेल्या इंग्यामुळं होत आहे. (Will smith oscars 2022)
पत्नीविषयी अभद्र कमेंट केली जाताच विलनं व्यासपीठावर येत विनोदवीर क्रिस रॉक याच्या कानशिलात लगावली.
नेमकं काय झालं?
क्रिसनं विलची पत्नी जेडा पिंकेट स्मिथ हिनं मुंडन केल्याचं पाहत तिची खिल्ली उडवली. ज्यामुळं सहाजीकच त्याचा पारा चढला. ज्यानंतर विलनं तडक व्यासपीठ गाठत क्रिसचा दिवसा तारे दाखवले.
सदर प्रकरणी त्यानं नंतर माफीही मागितली. पण, व्हायचं ते झालं आणि आता यासंबंधीच्या चर्चांनीही जोर धरला.
कोण आहे विल स्मिथ?
विलार्ड कॅरल स्मिथ द सेकंड असं त्याचं खरं नाव. अभिनयासोबतच तो रॅपिंग, निर्मीती क्षेत्रातही सक्रिय आहे. 'द फ्रेश प्रिंस ऑफ बेल एअर' या शोसाठीही विल ओळखला जातो.
कारकिर्दीची सुरुवात त्यानं रॅपिंगपासून केली होती. 'अली', 'मेन इन ब्लॅक फ्रँचायझी', 'द परस्यूट ऑफ हॅपिनेस', 'हँकॉक' आणि 'किंग रिचर्ड' या चित्रपटांसाठी विल ओळखला जातो.
'अलादीन'मध्ये त्यानं साकारलेल्या जिनीच्या भूमिकेलाही प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
विलच्या पत्नीबाबत सांगावं, तर 1997 मध्ये त्यानं जेडा पिंकेटशी लग्न केलं. हे विलचं दुसरं लग्न होतं. आपल्याला Alopecia नावाचा केस गळण्याचा आजार असल्याचं जेडानं सांगितल्याची माहिती समोर येत आहे.