पॅडमॅनचे नवे `सयानी` गाणे प्रदर्शित...
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा पॅडमॅन हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा पॅडमॅन हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अक्षयसोबत राधिका आपटे आणि सोनम कपूर देखील प्रमुख भूमिकेत आहेत. अलीकडेच अक्षयने चित्रपटाचे नवे गाणे सोशल मी़डियावर रिलीज केले.
अक्षयने विचारला हा प्रश्न
सयानी... असे हे गाणे आहे. यशिता शर्मा, जोनिका गांधी, यशिका सिक्का आणि राणी कोर यांनी हे गाणे गायले आहे. अमित त्रिवेदी यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. तर गीतकार कौसार मुनीर आहे.
अक्षय कुमारने ट्विटर हॅंडलवर हे गाणे रिलीज केले. त्याचबरोबर त्याने एक प्रश्नही विचारला आहे. अक्षय म्हणतो, 'लड़की सयानी हो गई लेकिन हम कब होंगे?' सांगा.
चित्रपटाबद्दल काही...
हा चित्रपट रियल लाईफ हिरो अरुणाचलम याच्या आयुष्यावर आधारित आहे. या व्यक्तीने महिलांसाठी कमी दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून दिले. चित्रपटात अक्षय अरुणाचलमच्या भूमिकेत झळकणार आहे.
पूर्वी हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र पद्मावतच्या वादानंतर संजय लीला भन्सालींशी सामंजस्याने चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट ८ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची निर्मिती अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाने केली आहे. या चित्रपटाद्वारे तिने निर्मिती क्षेत्रात पर्दापण केले आहे.