मुंबई : संजय लिला भन्साळी यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'पद्मावत' सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या सिनेमावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. या वादानंतर अभिनेत्री दीपिकाने मोठा निर्णय घेतला आहे.


'पद्मावत' सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या वादामुळे 'पद्मावत' सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा होती. तसेच प्रेक्षकांना उत्सुकताही लागली होती. सिनेमाला होणारा विरोध लक्षात घेऊन १ डिसेंबर ही सिनेमा रिलीजची तारीख बदलून ती २५ जानेवारी रोजी सिनेमा प्रदर्शित करण्यात आला.


हे पण पाहा: 'पद्मावत'वर पूनम पांडेने केलं ट्विट, युजर्सने म्हटलं...


सिनेमा प्रदर्शित करण्यास परवानगी


हा वाद न्यायालयापर्यंत पोहोचला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा सिनेमा प्रदर्शित करण्यास परवानगी दिली.


दीपिकाने घेतला मोठा निर्णय


'पद्मावत' सिनेमाला होत असलेल्या विरोधामुळे सिनमातील स्टार कास्टला खूपच त्रास झाला. या सिनेमात मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेत्री दीपिका पदुकोणने मोठा निर्णय घेतला आहे. आता यापुढे अशा प्रकारच्या इतिहासावरील आधारित सिनेमात काम करणार नसल्याचा निर्णय दीपिकाने घेतला आहे.


हे पण पाहा: 'पद्मावत' सिनेमा फेसबुकवर Leaked! १५ हजार युजर्सने केला शेअर


दीपिकाने म्हटलं...


एका कार्यक्रमात अभिनेत्री दीपिकाला प्रश्न विचारण्यात आला होता की, या पुढे असा प्रकारच्या भूमिका करणार का? या प्रश्नाला उत्तर देताना दीपिकाने म्हटलं, "एवढं झाल्यानंतर आता अशा प्रकारच्या भूमिका मी करणार नाही".


फेसबुकवर ऑनलाईन लीक


पद्मावत सिनेमा फेसबुकवर ऑनलाईन लीक झाला आहे. जवळपास साडेतीन लाख यूझर्सनी हा ऑनलाईन लीक झालेला सिनेमा पाहिल्याचं बोललं जात आहे.