जयपूर : गेल्या अनेक दिवसांपासून वादग्रस्त ठरलेला संजय लीला भन्साळी यांचा पद्मावत हा सिनेमा राजस्थानात प्रदर्शित होणार नाही. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी सोमवारी ही माहिती दिली.


राजस्थानात प्रदर्शित होणार नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्टनुसार, पद्मावत हा सिनेमा येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. यावर बोलताना वसुंधरा राजे म्हणाल्या, राज्यातील लोकांच्या भावनांचा आदर करता हा सिनेमा राज्यातील कोणत्याच सिनेगृहात प्रदर्शित होणार नाही


राणी पद्ममिनी यांनी दिलेले बलिदान हे राज्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे राणी पद्मावती हा केवळ एक इतिहासातील धडा नाहीये तर तो आमचा मोठेपणा आहे. त्यामुळे याचा आम्ही अपमान करु देणार नाही, असे वसुंधरा राजे म्हणाल्या.


पद्मावत या सिनेमाला सुरुवातीपासूनच विरोध सुरु आहे. याआधी या सिनेमाचे नाव पद्मावती असे ठेवण्यात आले होते मात्र त्याला होणाऱ्या विरोधामुळे पद्मावती सिनेमाचे नाव बदलून पद्मावत करण्यात आलेय.