नवी दिल्ली : संजय लीला भन्सालींचा 'पद्मावती' सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यामुळे या सिनेमाची प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे. मात्र, असं असलं तरी वाद काही थांबण्याचं नाव घेत नाहीये.


'पद्मावती' सिनेमा विरोधात भाजप नेते


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पद्मावती' सिनेमा विरोधात भाजपचे नेते मैदानात उतरल्याचं पहायला मिळत आहे. हरियाणा भाजपचे चीफ मीडिया कॉर्डिनेटर सुरज पाल यांनी एक धमकीच दिली आहे.


शिरच्छेद करणाऱ्यास १० कोटी


ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, सुरज पाल यांनी म्हटलं की, अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांचा शिरच्छेद करणाऱ्यास ५ कोटी रुपयांचे बक्षिस देण्याची घोषणा करणाऱ्या युवकाला त्यांनी शाबासकी दिलीय. इतकेच नाही तर, शिरच्छेद करणाऱ्याला ५ कोटी नाही तर आम्ही १० कोटी रुपये देऊ आणि त्याच्या कुटुंबाचीही काळजी घेऊ असंही सुरज पाल यांनी म्हटलं आहे.



रणवीरचे पाय तोडून हातात देऊ


सुरज पाल यांनी सिनेमात अलाउद्दीन खिलजीची भूमिका करणाऱ्या रणवीरलाही धमकी दिली आहे. रणवीरने आपले वक्तव्य मागे न घेतल्यास त्याचे दोन्ही पाय तोडून हातात देऊ असा इशाराच सुरज पाल यांनी दिला आहे.



वेळ आपल्यास राजीनामा देऊ


सुरज पाल अम्मू यांनी म्हटलं की, हा सिनेमा आम्ही कोणत्याही परिस्थितीत प्रदर्शित होऊ देणार नाही. आवश्यकता पडल्यास आपण भाजपचा राजीनामा देण्यासही मागेपुढे पाहणार नाही.


...तरच भाजपला मतं मिळतील


या सिनेमावर बंदी घातली तरच आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत राजपूत समाजाची मते भाजपला मिळतील असंही सुरज पाल यांनी म्हटलं आहे.